Monday, 26 December 2022

अभाविप चे ५७ वे कोकण प्रदेश अधिवेशन ऐतिहासिक कल्याण नगरीत !

अभाविप चे ५७ वे कोकण प्रदेश अधिवेशन ऐतिहासिक कल्याण नगरीत !

कल्याण, नारायण सुरोशी : ऐतिहासिक कल्याण नगरीत होणारे ५७ वे‌ कोकण प्रदेश अधिवेशन २९, ३०, ३१ डिसेंबर २०२२ रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके मैदान, लाल चौकी येथे संपन्न होणार आहे. मैदानाच्या परिसराला आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नगर असे नाव देण्यात आले. अधिवेशन मुख्य स्थळाच्या मुख्य सभागृहाला डॉ आनंदीबाई गोपाळ जोशी हे देण्यात आले आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अशा कल्याण शहराच्या प्रदर्शनी कक्षाचे नाव अतुल पाटणकर असे देण्यात आले आहे.
अधिवेशनाचे उद्घाटन श्रीमती युक्ता मुखी (विश्वसुंदरी, १९९९) यांच्या हस्ते होणार आहे व प्रमुख उपस्थिती डॉ उज्वल चक्रदेव, एस एन डि टी विद्यापीठ) हे असणार आहेत. प्रदर्शनी उद्घाटक डॉ विवेक मोडक (विभाग संघचालक, रा. स्व. सं) तसेच प्रमुख उपस्थिती मा. आमदार नरेंद्र पवार

 या अधिवेशनात 'गोवा ते पालघर' असे विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.  या अधिवेशनाच्या प्रदर्शनीमध्ये ऐतिहासिक वारसा व इथल्या सामाजिक सांस्कृतिचा सामावेश असणार आहे.

विविध प्रकारची शैक्षणिक व सामाजिक चर्चासत्रे, वेगवेगळ्या शैक्षणिक विषयावरील प्रस्ताव व त्यावरील उपस्थित विद्यार्थ्यांचे मत प्रदर्शन, शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम व मान्यवरांचे शैक्षणिक, सामाजिक प्रबोधन हा या अधिवेशनाचा मूळ गाभा असून एक सशक्त, समाजोपयोगी कर्तव्यदक्ष व देशप्रेमी युवक घडावा अधिवेशनाचा विचार असल्याचे सांगितले यावेळी डॉ महेश भिवंडीकर (स्वागत समिती अध्यक्ष), श्री प्रसाद कुलकर्णी (स्वागत समिती सचिव), प्रा. प्रिती भरणुके (कल्याण शहर अध्यक्ष), भुमिका देशपांडे (कल्याण शहर मंत्री) उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...