Monday, 26 December 2022

लोकविकास नागरी सहकारी बँक संस्थापक पॕनलला प्रचंड मतदारांचा प्रचंड प्रतिसाद - "सौ.अनुराधा आंबादास दानवे"

लोकविकास नागरी सहकारी बँक संस्थापक पॕनलला प्रचंड मतदारांचा प्रचंड प्रतिसाद - "सौ.अनुराधा आंबादास दानवे"

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २६ :-  लोकविकास नागरी सहकारी बँकेची निवडणूक येत्या ८ जानेवारी २०२३ ला होत असून, लोकविकास संस्थापक पॕनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्यासाठी *सौ.अनुराधाताई अंबादास दानवे* मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना विनंती करत प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन करत आहेत.

यावेळी प्रामुख्याने प्रचार फेरीत  श्रीमती दानवे ताई सोबत भाऊसाहेब काळे, अमितभैय्या बोरसे उपस्थित होते. यावेळी मतदार बंधु वा भगिनींनी भरभरून प्रतिसाद देत उमेदवारांचा घरोघरी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी प्रचार फेरीत औरंगाबाद शिवसेना उपशहर प्रमुख प्रमोद ठेंगडे पाटील, माजी नगरसेवक विनोद सोनवणे, शिवसनेचे कट्टर समर्थक सत्यवान रगडे, रामदास वाघमारे, देविदास पवार, सुखदेव जिगे, सुखराज हिवराळे, झिंजुर्डे सर, पंकज पाटेकर मनोज चव्हाण सुखराज हिवराळे सुभाष आडे संतोष खंदारे किरण गायकवाड आदी उपस्थित होते..

No comments:

Post a Comment

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...