Thursday, 1 December 2022

समेळगावात अनधिकृत मोबाईल टॉवर चा विळखा ; टॉवरच्या रेडिएशन मुळे समेळगावातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात !!

समेळगावात अनधिकृत मोबाईल टॉवर चा विळखा ; टॉवरच्या रेडिएशन मुळे समेळगावातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात !! 

अनधिकृत मोबाईल टॉवरवर कडक कारवाई करण्याची बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गटाची ) मागणी - 'सौ.रूचिता अमित नाईक'
*महिला आघाडी शहर संघटक नालासोपारा शहर (प)*

वसई, प्रतिनिधी :    समेळगावात अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट सुरू असताना आता समेळगावातील दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात ठिकठिकाणी इमारतीवर अनधिकृत मोबाईल टॉवर उभारत असल्याने टॉवरच्या रेडिएशन मुळे समेळगावातील शाळा, अंगणवाडीतील लहान मुलांचे तसेच  नागरीकांचे आरोग्यावद दुष्परिणाम होण्याची भिती आहे.

मोबाईल टॉवर हे दाट लोकवस्ती शाळा, अंगणवाडी पासुन 100 मी अंतर ठेवणे गरजेचे आसताना हि महापालिकेला न जुमानता अनधिकृत मोबाईल टॉवर बांधण्याचे काम सुरू आहे.

मोबाईल टॉवर चा रेडिएशन मुळे विविध प्रकारचे आजार होतात  कॅन्सर, कर्करोग, स्मरणशक्ती रोग, एकाग्रता नष्ट होणे, यासारखे आजार उध्ववु शकतात.

मोबाइल कंपनीकडून टॉवरच्या मोबदल्यात महिन्याला चांगले पैसे मिळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याची पर्वा न करता टॉवर उभारले जात आहेत. या टॉवरला परिसरातील नागरिकांचा विरोध असून, टॉवरमुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने तातडीने हे काम थांबवून अनाधिकृत टॉवर उभारणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी माझ्याकडे केली असुन याबाबत मोबाईल टॉवर उभारण्याबाबत घेण्यात येणारया परवानगी या सर्वांची चौकशी करून तातडीने मोबाईल टॉवर चे काम थांबवुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी *जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर साहेब* यांच्या मार्गदर्शनाने रूचिता नाईक यांनी केली.
याबाबत आयुक्त मंत्रालयात असल्याने सहा.आयुक्त अजित मुठे यांची भेट घेतली तातडीने कारवाई करण्याबाबत प्रभाग समिती ई चे वनमाळी यांना आदेश देण्यात आले..

No comments:

Post a Comment

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !!

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !! मुंबई (शांताराम गुडेकर) :         ...