औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १ : गांधी भवन शहागंज येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.कल्याण काळे व शहर अध्यक्ष युसुफ शेख यांच्या हस्ते पीक विमा केंद्राचे उदघाटन करण्यात आले औरंगाबाद जिल्ह्य मध्ये मागील काही काळास शेतकऱ्याच्या पिकाचे आतोनात नुकसान झलेले आहे,
औरंगाबाद जिल्हा एकूण ७४८००० (सात लाख आठेचाळीस हजार) शेतकर्यांनी पिकविमा भरलेला आहे, अद्याप पर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला पीकविमा चा लाभ झलेला नाही, त्या अनुषंगाने शेतकर्यांना पीकविम्याचे लाभ मिळावा या साठी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी पीकविमा केंद्र सुरु करण्यास आलेला आहे, त्या दृष्टीने ज्या शेतकर्यांना पिकविम्याचा लाभ मिळालेला नाही, अश्या शेतकऱ्यांचा आम्हीं जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने फाॅर्म भरून महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटी कडे सर्व फाॅर्म जमा करणार आहेत व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वतीने हिवाळी अधिवेश्नात प्रश्न मांडणार आहेत जर या अधिवेशनात शेतकर्यांना न्याय मिळाला नाही तर कॉंग्रेस पक्ष न्यायालयात लढाई लढून शेतकर्यांना मदत मिळून देण्याच्या भूमिकेत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील आज रोजीची परिस्तिथी जिल्ह्यातील एकूण पीकविमा भरणा केलेल्या ची सख्या ७४८००० इतकी आहे, त्या पैकी फक्त ६५००० शेतकरी या पीकविमा योजनात बसू शकतात असे पिकविमा कंपनीने जाहीर केले. या कार्यक्रम प्रसंगी भाऊसाहेब जगताप, जयप्रकाश नरनावरे, अतिश पितळे, जगन्नाथ काळे , संदीप बोरसे, पवन डोंगरे, अनिस पटेल, अंबादास गायके, मालोदे, मुद्दसर पटेल, शिवाजीराव ढाकणे, संतोष शेजूळ, शेख कदिर, विजय पोफळे, शुभम बनकर, पुंडलिक जंगले व काही शेतकरी शामसिंघ घुसिंघे, बापूराव पोफळे, संजय पोफळे, उपस्थित होते.
No comments:
Post a Comment