मधुकर सहकारी साखर कारखाना येथील कामगारांच्या उपोषणास फैजपूर येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची भेट...
फैजपूर/ (यावल) दि २७ : येथे मधुकर सहकारी साखर कारखाना लि. येथील कामगारांनी प्रलंबित देणी मिळणेसाठी दि.२६/१२/२०२२ पासून बेमुदत आंदोलन पुकारले असता, आज *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला व सर्व कामगारांच्या मागण्या जाणून घेऊन, कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या परीने पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्या समोर विविध मागण्याचा कामगारांनी पाढा वाचतांना भविष्य निर्वाहन निधी, सेवा निवृत्त कामगारांचे अंतिम देयक, जानेवारी २०१७ पासूनची थकीत देणी तसेच कामगारांशी संलग्न असलेल्या संस्थांची थकीत देणी इ. मागण्या असून, कारखाना लिलावाच्या रकमेतून सदर मागण्या पूर्ण करणे बाबत सांगितले असता, जिल्हा बँक चेअरमन व कार्यकारी संचालक यांच्याशी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी दूरध्वनीद्वारे चर्चा करून योग्यतो मार्ग काढणेबाबत कळविले असता, उद्या दि.२८/१२/२०२२, सकाळी १०.०० वा मधुकर सहकारी साखर कारखाना, फैजपूर येथे चर्चेसाठी बैठक आयोजन करणे बाबत त्यांनी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांना आश्वासन दिले.
यावेळी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्यासह भरत महाजन,नरेंद्र नारखेडे, उमेश फेगडे, उज्जैनसिंग राजपूत, कामगार संघटनेचे पदाधिकारी व असंख्य कामगार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment