Wednesday, 25 January 2023

ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट क्लबची फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2023 ही स्पर्धा संपन्न !

ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट क्लबची फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2023 ही स्पर्धा संपन्न !

मुंबई, (अश्विनी निवाते) :

ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट क्लब, जोगेश्वरी या मंडळाने उपनगरातील सर्वात मोठी स्थानिक खेळाडूंसाठीची फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2023 ही स्पर्धा दिनांक २१/०१/२०२३ आणि २२/०१/२०२३ रोजी आयोजित केली होती. 

ह्या स्पर्धेत एकूण ४० संघांनी भाग घेतला होता. कोणीही पुरस्कर्ता नसताना मंडळाच्या सभासदांनी आपापल्या परीने आर्थिक मदत करून ही स्पर्धा यशस्वी केली. ह्या स्पर्धेचे एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या स्पर्धेतील दोन्ही दिवसांचा पहिला सामना हा सकाळी ठीक 8 वाजता चालू व्हायचा. 

स्पर्धेदरम्यान शनिवार दिनांक २१/०१/२०२३ रोजी जोगेश्वरी पोलीस ठाणे विरुद्ध ऑक्सिजन मास्टर्स असा प्रदर्शनी सामना खेळवण्यात आला होता. 

स्पर्धेचा विजेता संघ अजिंक्य इलेव्हन संघाला रोख रक्कम रु.५५०००/ व भव्य चषक तसेच उपविजेता संघ लिली बॉईज संघाला रोख रक्कम रु.३००००/ व भव्य चषक देऊन गौरविण्यात आले. शिवसेना विभागप्रमुख श्री. जयवंत लाड साहेब यांनी मैदानात लाल माती व टँकर ने पाणी मारून त्यानंतर पूर्ण मैदानात रोलर फिरवून मैदान खेळण्यायोग्य बनविले.मंडळाचे जेष्ठ खेळाडू अजित सावंत, राजू भालेकर, मनोज सातम, सुनील नायर, नवनीत सावंत, निलेश पेंडूरकर यांनी तरुण पिढीला साथ घेऊन ह्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.

No comments:

Post a Comment

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न "

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न " सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त...