मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिकेसी मैदानातील तयारीचा घेतला आढावा !
देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या उद्याच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बीकेसी येथील मैदानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन केलेल्या तयारीचा आढावा घेतला.
माननीय पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या मुंबईत ३८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण होणार असून या विकासकामांमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. आज बीकेसी मैदानात होणाऱ्या सभेच्या तयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेऊन अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या.
राज्यात युती सरकार पुन्हा सत्तेमध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मुंबईत येत असून ही सभा भव्य आणि अविस्मरणीय ठरावी यासाठी बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष संपूर्णपणे सज्ज आहोत.
याप्रसंगी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार राजहंस सिंह, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे, समन्वयक आशिष कुलकर्णी, प्रवक्ते किरण पावसकर, प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, विभाग संघटक सौ.कला शिंदे तसेच बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.
No comments:
Post a Comment