**बातमीदार माझा** चा **इम्पँक्ट**
मुरबाड तालुक्यातील सर्व जि.प.शाळांत १९ जानेवारी रोजी साजरी होणार क्रांतीविर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांची जयंती !!
मुरबाड ( मंगल डोंगरे ) : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील सिद्धगड रणसंग्रामातील पहिले हुतात्मा विर हिराजी गोमाजी पाटील यांचा जन्म १९ जानेवारी १९१४ यांचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना सिद्धगड विरभुमी येथे २ जानेवारी १९४३ रोजी बलिदान झाले.
सदर बलिदान भुमिचे ठिकाण आपल्या मुरबाड तालुक्यातील मौजे खानिवरे ग्रामपंचायत हद्दीत असल्याने त्यांच्या बलिदानाची थोरवी, व त्यांच्या चित्र, चरित्राचा इतिहास विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत पोहचावा. या उद्दात हेतूने तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये १९ जानेवारी हा दिवस विर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील, यांची जयंती साजरी व्हावी. अशी मागणी मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती श्रीकांत धुमाळ तसेच प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष एस.एल. तथा शरद-पाटील भुंडेरे यांनी, एका लेखी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी पंचायत समिती मुरबाड यांचेकडे केली होती.
त्या मागणी संदर्भात पत्रकार मंगल डोंगरे यांनी आपल्या **बातमीदार माझा** या 'वेब व्रुतपत्रा'मध्ये बातमी प्रसिद्ध करताच, मुरबाड पंचायत. समिती प्रशासन खडबडून जागे होऊन, गटविकास अधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी यांना फर्मान काढताच, गटशिक्षणाधिकारी संप्रदा पानसरे यांनी तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुखांना लेखी आदेशानुसार सर्व शाळांमध्ये 19 जानेवारी हा दिवस क्रांतीविर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांची जयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत माजी सभापती श्रीकांत धुमाळ व प्रहार संघटनेचे अध्यक्ष एह.एल. तथा शरद पाटील यांनी पत्रकार मंगल डोंगरे व वृत्तपत्र बातमीदार माझा चे आभार व्यक्त केले.
No comments:
Post a Comment