दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे 'आदिती जोशी' यांची मैफील !
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने ‘पं. भातखंडे संगीत सभा’ अंतर्गत रविवार दिनांक २२ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता अदिती जोशी यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. त्यांना तबल्याची साथ मंदार पुराणिक आणि संवादिनीची साथ ज्ञानेश्वर सोनवणे करतील. हा कार्यक्रम कै. य. वि. भातखंडे यांच्यावतीने पुरस्कृत केला आहे.
आदिती जोशी यांची गायकी ग्वाल्हेर घराण्याची असून त्यांना कै. पं. यशवंतबुवा जोशी, कै. विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांचे मार्गदर्शन मिळाले असून सध्या त्या अपूर्वा गोखले यांच्याकडून तालीम घेत आहेत. गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत अलंकार परिक्षेत त्यांना सुवर्णपदक मिळाले आहे. त्यांना ‘सूरमणी’ हा किताब प्राप्त झाला आहे. अनेक संगीत महोत्सवांमधे त्यांनी कार्यक्रम सादर केले आहेत. अधिकाधिक रसिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment