जीवनात पाणी महत्त्वाचा घटक : प्रशांत अवसरमल
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १८ : आपल्या जीवनात पाणी हे अंत्यत महत्वाचा घटक असून, त्याचे संवर्धन व जतन करणे काळाची गरज आहे. त्यामुळे नदी नाल्याव्दारे वाहून जाणारे पाणी श्रमदान शिबिर राबवून 'पाणी आडवा पाणी जिरवा' ही मोहीम हाती घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. प्रशांत अवसरमल यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत एमआयटी महाविद्यालय सिडको यांच्या वतीने भांबर्डा ता.जि. औरंगाबाद येथे विशेष शिविरात १६ जानेवारीपासून सुरू झाले. उद्घाटनप्रसंगी अवसरमल बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. महेंद्र कोंडेकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच इंदू पठाडे होत्या. याप्रसंगी उपसरपंच सजन शिंदे, ग्रा.पं.सदस्य संतोष फुकटे, विजय काकडे, राजेंद्र काळे, श्रीराम भवर, सुमनबाई दिवटे, शालेय समिती होती.
अध्यक्ष भीमराव पठाडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष बळीराम काळे, शालेय समिती उपाध्यक्ष सोमिनाथ जाधव, शिक्षक जिजा उकर्डे, जीवन साळुंके, प्रा. रंजय काळे, प्रा. भास्कर कदम, प्रा. सुषमा सपकाळ, प्रा. मधुकर जंजिरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी विजया पाटील, सचिन कोल्हे हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम जलसाक्षरतेची शपथ सर्व गावकऱ्यांसोबत घेतली. या सात दिवशीय शिबिरात वृक्षारोपण, झाडांना व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन व शालेय विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान या विषयावर सात दिवस कार्यशाळा घेण्यात येणार आहे. प्रास्ताविक एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. विजया पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन रोहित जवरे यांनी केले. याप्रसंगी एनएसएसच्या अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment