वेळंब-घाडेवाडीत मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन !
[ निवोशी/गुहागर : उदय दणदणे ]
गुहागर तालुक्यातील वेळंब ग्रामपंचायत सरपंच समीक्षा बारगोडे यांच्या सहकार्याने सोमवार दिनांक.३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी-०९ ते दुपारी ०३ वाजेपर्यंत वेळंब -घाडेवाडी, (जुवेवाडी -सभागृह) येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच चष्मा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .व्हिजन आर एक्स लॅब प्रा.लि. मुंबई आणि आधार फाउंडेशन रजि. यांच्या संयुक्त विद्यमाने, डॉ. लिसा (M.O) आणि डॉ.उमेश ग. चाफे, यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिरात मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप करण्यात येणार असल्याचे महत्वपूर्ण माहिती वेळंब गावचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील स्वप्नील बारगोडे यांनी दिली. सदर प्रसंगी घाडेवाडी व जुवेवाडी ग्रामस्थांच्या वतीने वेळंब ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सदर शिबिराचा जास्तीत जास्त ग्रामस्थ गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन वेळंब गावच्या सरपंच समीक्षा बारगोडे यांनी केले आहे. अधीक माहितीसाठी- ९४०३८३४१२७ सदर नंबरवर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment