मुरबाड तालुका खादीग्रामोद्योग संघाच्या चेअरमन पदी सागर कार्ले यांची, तर व्हाईस चेअरमन पदी पत्रकार श्याम राऊत यांची बिनविरोध निवड !!
मुरबाड { मंगल डोंगरे } : आज झालेल्या मुरबाड तालुका विविध कार्यकारी ग्रामोद्योग संघाच्या निवडणूक प्रक्रियेत चेअरमन पदी सागर सुरेश कार्ले यांची तर व्हाईस चेअरमनपदी पत्रकार श्याम राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .
मुरबाड तालुका विविध कार्यकारी ग्रामोद्योग संघाकडून रोजगार निर्मितीसाठी बारा बलुतेदार, कारागीर यांना विविध बॅंकांच्या माध्यमातून सवलतीच्या दरात कर्ज पुरवठा केला जातो. ही संस्था हमीदार म्हणून काम करते . मुरबाड संस्थेत जवळपास इतके सभासद असुन, 150 व्यवसाय या संस्थेच्या अंतर्भूत येत असून संस्थेची पंचवार्षिक निवडणूक मागच्या महिन्यात बिनविरोध झाली होती. तर आज अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक सह्हायक निबंधक सहकारी संस्था मुरबाड येथील कार्यालयात पार पडली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमदार किसन कथोरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव, संजय हंडोरे पाटील, कांतीलाल कंटे यांनी प्रयत्न केले. यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालक, तसेच संस्थेचे सचिव आर डी निरगुडा हे हजर होते.
No comments:
Post a Comment