मुरबाडच्या सुरक्षित रस्त्यासाठी तिनहात नाका पोलिस चौकीवर पडणार हातोडा !!
**वाहतुक कोंडीतुन मुरबाडकर घेणार मोकळा श्वास.**
मुरबाड { मंगल डोंगरे } : सुंदर मुरबाड च्या सौंदर्यात पडणार 130 फुटाच्या राष्ट्रध्वजाची भर,मुरबाडच्या तिनहात नाक्यावर डौलाने फडकणार देशाचा राष्ट्रध्वज,आणि वाहतूक कोडींची डोकेदुखी ठरणारी चौकी तुटून मुरबाडकर घेणार मोकळा श्वास. कल्याण - नगर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मुरबाड तीन हात नाक्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीस अडथळा ठरत असलेली पोलिस चौकी हटविण्यात बाबत व तेथे सुरळीत वाहतुक होण्यासाठी सिग्नल लावणे संबंधी आमदार किसन कथोरे व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महेश म्हसे आणि पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी चर्चा करून पोलिस चौकी तोडण्याचा निर्णय घेतल्याने मुरबाड करांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
कल्याण नगर या राष्ट्रीय महामार्गाचे होणारे चौपदरीकरण तसेच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने नाशिक- शहापूर-मुरबाड- पुणे या महामार्गाचे सुरु केलेले काॅक्रीटीकरण यामुळे मुरबाड मधिल तीन हात नाका येथे होणारी वाहतुक कोंडी मुळे वाहन चालक व प्रवाशांना त्रास होत असुन राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींना तसेच विविध आजारांवरील रुग्णांना तातडीचे उपचार मिळण्यासाठी अनेक समस्या निर्माण होत असल्याने, मुरबाड तीन हात नाक्यावर रस्त्याचे दोन्ही बाजूला असणारे टपरी धारक, फुटपाथवर अनधिकृत पणे बसणारे फेरीवाले यांना हटवुन तेथे सिग्नल व्यवस्था करणे, या शिवाय त्या मध्यवर्ती ठिकाणी सुमारे एकशे तीस फुटांचा राष्ट्रीय ध्वज फडकविणात येऊन या नाक्याचे सुशोभीकरण करण्यासाठी प्रथम पोलिस चौकी हटविण्यात यावी. असा निर्णय घेतल्याने मुरबाड तीन हात नाक्यावरील वाहतूक कोंडी सुटणार असुन त्या नाक्याचा कायापालट होणार आहे. मुरबाडचे कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाडचा कायापालट होत असून, चोहोबाजूंनी होत असलेल्या बदलामुळे स्वच्छ, सुंदर मुरबाड शहराच्या सौंदर्यात नाक्यावर नव्याने उभ्या राहणा-या 130 फुटाच्या राष्ट्रध्वजामुळे भर पडणार असल्यामुळे आनंद व्यक्त केला जात आहे.
No comments:
Post a Comment