Tuesday, 17 January 2023

पिक विमासंदर्भातील तक्रारीचा दर शुक्रवारी तालुकास्तरावर होणार निपटारा !

पिक विमासंदर्भातील तक्रारीचा दर शुक्रवारी तालुकास्तरावर होणार निपटारा !

अकोला, अखलाख देशमुख, दि. १७  :  प्रधानमंत्री पिक विमा योजना संदर्भांतील शेतकऱ्यांच्या तक्रारारीचे निवारण तालुकास्तरावर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले. त्याअनुषंगाने संबधित तालुकातील तहसिलदार यांचे अध्यक्षतेखाली दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता पिक विमा संदर्भातील तक्रारांरीचे  निराकरण करण्यात येईल. शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारीचे निवारणाकरीता संबधित तहसिलदार व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे. 

 प्रधानमंत्री पिक विमा योजना लोंबार्ड विमा कंपनी मार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. तालुका स्तरावरील शेतकऱ्यांच्या पिक विमा संदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तहसिलदार यांचे अध्यक्षतेखाली तालुका कृषि अधिकारी, पिक विमा प्रतिनिधी तसेच तालुकास्तरीय समितीमधील सदस्यांच्या उपस्थितीत दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता संबंधित तालुक्यात निराकरण करण्यात येईल. याकरीता शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्यातील तहसिलदार व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधून दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

वीर वाजेकर महाविद्यालयात लायन्स क्लबची स्थापना !!

वीर वाजेकर महाविद्यालयात लायन्स क्लबची स्थापना !! उरण दि १६, (विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर आर्ट सायन्स कॉ...