Tuesday, 17 January 2023

शहरातील रस्त्याच्या डांबरीकरण कामाची महापौरांनी केली पाहणी !

शहरातील रस्त्याच्या डांबरीकरण कामाची महापौरांनी केली पाहणी !

जळगाव, अखलाख देशमुख, दि १७  :  शहरात रस्त्यांच्या डांबरीकरण करण्याच्या कामांना गती आली आहे. शहरातील काव्यरत्नावली चौक ते ‘डी-मार्ट’ पर्यंत म्हणजे पाचोरा रस्त्यापर्यंत डांबरीकरण काम सुरू करण्यात आले आहे. 

मंगळवार, दि.17 जानेवारी 2023 रोजी शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या संचालिका तसेच जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी काव्यरत्नावली चौकाजवळ सुरु असलेल्या रस्ते कामाच्या ठिकाणी जाऊन कामाची पाहणी करून अभियंत्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी महानगरपालिकेचे अभियंता यांच्यासह ठेकेदाराचे सुपरवायझर व परिसरातील नागरिक उपस्थित होते. पाहणीप्रसंगी महापौर सौ.महाजन यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद देखील साधला.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...