सौ सुवर्णाताई कानवडे (शेळके) - ठाणे जिल्हा अध्यक्ष युनिफाईड ह्युमन राईट्स कौन्सिल
आज प्रत्येक महिला ही सक्षम आणि स्वतःच्या पायावर उभी राहणे गरजेचे आहे.. असं सुवर्णाताई यांना वाटतं आणि त्या त्यासाठी मेहनत पण घेत आहेत.
महिलांच्या सक्षमीकरणामुळे आर्थिक, सामाजिक, राजकीय चक्रातील लैंगिक परिभाषेच्या चक्रास अडचण निर्माण होईल आणि त्यामुळे स्त्रियांना कमी लेखणे व त्यांची अधीनता कमी होऊन त्यांचा वैयक्तिक विकास होईल. महिलासक्षमीकरण म्हणजे त्यांना त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेण्यास आणि त्यांच्याक्षमता ओळखण्यास सक्षम बनविणे हा सुवर्णाताई यांचा उद्देश आहे
समाजामध्ये भरपूर पुरुषांची अशी मानसिकता आहे की महिलांनी फक्त 'चूल आणि मूल' याकडेच लक्ष दिले पाहिजे असे अनेक जणांना वाटते, पण आता महिलांनी चुला आणि मुलासोबतच 'देश आणि विदेश' यांकडेसुद्धा लक्ष देण्याची गरज आहे.असं सुवर्णाताई यांना वाटतं,,
स्त्रियांवरील अन्याय_अत्याचार दूर करण्यासाठी कठोर अंमलबजावणी आवश्यक आहेच, परंतु त्याबरोबरच आवश्य आहे ती जनजागृती. स्त्रियां/मुलींना मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे. असं सुवर्णताई यांना वाटतं आणि त्यासाठीच त्या त्यांच्या संस्थेमार्फत आणि शाळा, कॉलेज, स्वयंसेवी युनिफाईड ह्युमन राईट्स कौन्सिल ठाणे जिल्हा अध्यक्ष सौ सुवर्णाताई कानवडे या हा उपक्रम लवकरच कल्याण मध्ये राबवणार आहेत असं ताईंचं म्हणणं आहे..
महिलांना दिले जाणारे स्थान आता हल्लीच्या काळात बदलत जात आहे. परंतु हा बदल होत असताना असे जाणवते कि, खरच हा बदल होतो आहे का? कारण आपण प्रत्येकजण म्हणतो कि, स्त्रियांना त्यांचे सर्व अधिकार दिले गेले पाहिजेत. त्यांचे हक्क प्रदान केले पाहिजेत. पण खरे पाहिले असता पुरुषप्रधान संस्कृतीत मात्र महिलांना दुय्यमच स्थान आजही दिले जात असलेले दिसून येते. आजही अनेक ठिकाणी मुलगी जन्मास आली कि, तिला घरातुनच वागणूक व्यवस्थित मिळत नसल्याचे दिसते. हीच स्त्री आज पुरुषाच्या खांद्यास खांदा लाऊन प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तुत्व सिद्ध करीत असतानाही तिला आजही पुरुषी अहंमपणाचा सामना करावा लागतोय. असं सुवर्णाताई यांनी स्पष्ट केला आहे...
आजही काही क्षेत्रात महिलाना दुय्यम स्थान दिले जाते. आता सर्व बंद आहे, पण आपल्या आईला, ताईला आणि बायकोला सर्व काही कामापासून सुटका नाही. आजही काही ठिकाणी महिलांना अत्याचार सहन करावा लागतो आहे. परंतु पुरुष हे कधी स्त्रीयांवर होणारा अन्याय बंद करतील. हा सर्वात मोठा प्रश्न आहे..
म्हणतात स्त्रीयांना आणि पुरुषांना समान हक्क आहे.पण नेहमी स्त्रीयांना दुय्यम हक्क मिळतो. जेव्हा एक पुरूष शिकतो तेव्हा तो एकटाच सुशिक्षित होतो मात्र जेव्हा एखादी महिला शिकते तेव्हा तिची पूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते. असं सुवर्णाताई म्हणतात
कारण ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरुवात आहे आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे.स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व... समाजसेविका सौ सुवर्णाताई कानवडे (शेळके) युनिफाईड ह्युमन राईट्स कौन्सिल व मानवी अन्याय निर्मूलन संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष
सौ. सुवर्णाताई कानवडे - +91 89287 65351
No comments:
Post a Comment