ए.सी.पी.विशाल ढुमे यांना तात्काळ अटक करुन निलंबित करण्याची शिवसेना महिला आघाडीची मागणी !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १६ : औरंगाबाद शहरात दि.15-01-2023 रोजी रात्री 1.30 (दीड) वाजता लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने ए.सी.पी.विशाल ढुमे यांनी महिलेची छेड-छाड करुन विनयभंग केलेला आहे. व बळजबरीने घरात घुसुन काही व्यक्तींना मारहाण केलेली आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला असला तरी, त्यास अटक करुन त्वरित निंलंबित करण्याची मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली असून जिल्हा संघटिका प्रतिभा जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपायुक्त मुख्यालय अपर्णा गीते यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
औरंगाबाद शहरामध्ये पोलीस विभागाची अवस्था म्हणजे शेत राखणारेच कुंपन खात आहे. ए.सी.पी.विशाल ढुमे यांच्यावर कलम 354, 354-अ, 354-ड, 452, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल झालेला असुन, ए.सी.पी ढुमे यांच्यावर यांपुर्वीही अहमदनगर मध्ये असतानाही अशाप्रकारचा गुन्हा त्यांनी केलेला आहे. त्यामुळे विशाल ढुमे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने त्यांना पोलिस सेवेत ठेवणे, समाजाच्या दृष्टीने घातक ठरणार असल्याने त्यांना तात्काळ अटक करुन सेवेतुन निलंबित करण्याची मागणी शिवसेना महिला आघाडी च्या वतीने करण्यात आली.
जिल्हा संघटक सौ प्रतिभा जगताप यांच्या सह सौ.सुनिता आऊलवार, सुनिता देव, सौ.अंजली मांडावकर, नलिनी बाहेती, दुर्गा भाटी, आशा दातार, नलिनी महाजन, कविता सुरळे, आरती सोळुंके आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment