Thursday, 26 January 2023

रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिध्द "लयभारी" नमन प्रथमच मुंबई रंगमंचावर ; "संकल्प ग्रामविकास प्रतिष्ठान", निओशी तर्फे आयोजन !

रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिध्द "लयभारी" नमन प्रथमच मुंबई रंगमंचावर ; "संकल्प ग्रामविकास प्रतिष्ठान", निओशी तर्फे आयोजन !

मुंबई - (दिपक कारकर/शांताराम गुडेकर)

कोकणच्या लाल मातीत निर्मित झालेल्या अनेक लोककला आता सर्वत्रित सादर होताना दिसतात. नमन, भारुड, भजन, तमाशा, जाखडी नृत्य आदी लोककलेच्या प्रकारातील कोकणातील नमन लोककला दिवसेंदिवस अधकाधिक नावारूपास येताना दिसते, आजही ह्या लोककलांमध्ये आपले आयुष्य व्यतीत करणाऱ्या कलाकारांच्या पदरी शासकीय मानधन न मिळता, केवळ ह्या लोककलेच्या प्रवाहात ह्या कलेचा बाज, कलेचा वारसा जपणारी, लोककला जतन - संवर्धन करणारी असंख्य कलावंत मंडळी कोकणात आहे.

नमन कलेच्या विविधांगी कलागुणांनी भरगच्च भरलेलं, सध्यस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यात गाजत असणारे "श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ,रत्नागिरी" प्रथमच मुंबई रंगमंचावर आपली कला सादर करण्यास सज्ज झाले आहे.ह्या नमन मधून पौराणिक गण, सिंधुरासुराचा वध, ( रंभेचे नयनरम्य नृत्य ), शृंगारिक गवळण, कंस वध अशा स्वरूपातील बहारदार कार्यक्रम मुंबई रंगभूमीवर पाहणे रसिक प्रेक्षकांना पर्वणीच ठरणार आहे.

ह्या नमन कलेचं आयोजन रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील निओशी गावच्या "संकल्प ग्रामविकास प्रतिष्ठान" ( आम्ही सारे सोबती ), तर्फे मनोरंजन व निधी संकलन ह्या मुख्य हेतूने मंगळवार दि.३१ जानेवारी २०२३ रोजी रात्रौ ०८:३० वा.दामोदर नाट्यगृह, परळ ( मुंबई) येथे करण्यात आले आहे. ह्या सोहळ्याला मोठया संख्येनं उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.अधिक माहितीसाठी शशिकांत मांडवे - ९९८७३७५१८४, अजित तांबे - ९१६७७३३८७४ यांच्याशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

आई जीवदानी कला फाऊंडेशन महाराष्ट्र (रजि.) तर्फे नमन प्रेमींसाठी साहित्य संघ मंदिर येथे बहारदार कार्यक्रमाचे आयोजन !

आई जीवदानी कला फाऊंडेशन महाराष्ट्र (रजि.) तर्फे नमन प्रेमींसाठी साहित्य संघ मंदिर येथे बहारदार कार्यक्रमाचे आयोजन ! प्रतिनिधी - ...