Thursday, 26 January 2023

कल्याण तालुक्यात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा, म्हारळ मध्ये आशांचा सन्मान तर गोवेलीत शिवकालीन शत्र अस्त्रांचे प्रदर्शन !

कल्याण तालुक्यात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा, म्हारळ मध्ये आशांचा सन्मान तर गोवेलीत शिवकालीन शत्र अस्त्रांचे प्रदर्शन !

कल्याण, (संजय कांबळे) ::७४व्या भारतीय  प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कल्याण तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये म्हारळ गावातील लिटल स्टेप मेमोरियल स्कूल आणि ज्युनिअर काँलेज या संस्थेतर्फे कोव्हिड काळात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या आशा स्वयंसेविका यांचा सन्मान केला तर युवा संस्कार बहुऊदेशीय संस्था दहिवली यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन शत्र अस्त्रांचे प्रर्दशन भरविण्यात आले होते.

कल्याण तालुक्यातील वरप जिल्हा परिषद शाळेत सकाळी ध्वजारोहण झाले, यावेळी ग्रामपंचायतीच्या शाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. तर म्हारळ गावातील लिटल स्टेप मेमोरियल स्कूल व ज्युनिअर काँलेज यांच्या वतीने गावातून प्रभातफेरी काढली. 

विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाच्या झंकारात २२ आशा स्वयंसेविकाचे स्वागत करण्यात आले. त्यांनी कोव्हिड काळात जिवावर उदार होऊन बजावलेल्या कामगिरी बद्दल त्यांचा मुख्याध्यापिका गिता पेकळे यांच्या हस्ते 'कोव्हिडदूत, म्हणून सन्मान करण्यात आला. तर तालुक्यात समाजाभिमुख पत्रकारिता करत असल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भगवान पेकळे यांनी पत्रकार संजय कांबळे व सिध्दार्थ गायकवाड यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ,मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे,विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या मुलांना बक्षीस, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रायते येथे भारतीय समाज उन्नती मंडळाचे पद्मश्री आण्णासाहेब जाधव रायये विभाग हायस्कूल रायते शाळेतही झेंडावंदन झाले. तर गोवेली मधील जीवनदीप महाविद्यालयात युवा संस्कार बहु ऊद्देशीय संस्था दहिवली यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील गडकिल्ले, अस्त्र शत्रांचे तसेच इतर विविध ऐतिहासिक साहित्याचे प्रर्दशन भरविण्यात आले होते. याविषयी आपला कट्टा संस्थेचे पंकज भोसले, ममता भोसले यांनी माहिती दिली. यावेळी दहिवली चे सरपंच कमलाकर राऊत, पत्रकार संजय कांबळे, युवा संस्कार कार्यकर्ते अजय मिरकुटे, तेजस राऊत, विकास गायकवाड, भुषण म्हारसे, अनमोल जाधव, लतीफ शेख, कृष्णवेणी राचा, स्वाती बनसोडे, मनिषा दबडे, अनिता शर्मा, पूजा सिंग, शशी गुफ्ता, मेघा चौधरी, प्रिती सिंग आदी उपस्थित होते. 

दरम्यान कल्याण तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, शासकीय, निमशासकीय कार्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

No comments:

Post a Comment

आई जीवदानी कला फाऊंडेशन महाराष्ट्र (रजि.) तर्फे नमन प्रेमींसाठी साहित्य संघ मंदिर येथे बहारदार कार्यक्रमाचे आयोजन !

आई जीवदानी कला फाऊंडेशन महाराष्ट्र (रजि.) तर्फे नमन प्रेमींसाठी साहित्य संघ मंदिर येथे बहारदार कार्यक्रमाचे आयोजन ! प्रतिनिधी - ...