आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -2023 निमित्ताने तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन : नागनाथ घरत तालुका कृषी अधिकारी
बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) गुरुवार दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी 74 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माणगाव तालुक्यामध्ये तालुका कृषी अधिकारी माणगाव श्री. नागनाथ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये विविध ठिकाणी पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्ताने प्रचार ,प्रसिद्ध व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अशोकदादा साबळे विद्यालय माणगाव येथिल विद्यार्थ्यांनी पौष्टिक तृणधान्य वर्ष बद्दल सामूहिक शपथ घेतली.
यामध्ये पौष्टिक तृणधान्य आहारामध्ये वापरण्याबाबत जनजागृती करण्यात आली, तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय माणगाव येथे मा.श्री उमेश बिरारी उपविभागीय अधिकारी माणगाव, श्रीम. प्रियंका अहिरे तहसीलदार माणगाव, श्री राजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक, श्री ज्ञानदेव पवार नगराध्यक्ष मानगाव नगरपंचायत यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये सामूहिक शपथ घेण्यात आली व यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच माणगाव तालुक्यातील 25 ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा करण्याबद्दल जनजागृती मोहीम व सामूहिक शपथ याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये शाळा, ग्रामपंचायत कार्यालय व शेतकरी, युवावर्ग, महीला असे हजारोंच्या संख्येने लोकांनी यामध्ये सहभागी होऊन माहिती घेतली.
No comments:
Post a Comment