Monday, 2 January 2023

नवीन तंत्रज्ञान व्यवस्थापन जाणून घेण्यासाठी सिल्लोड येथील कृषि प्रदर्शनात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !

नवीन तंत्रज्ञान व्यवस्थापन जाणून घेण्यासाठी सिल्लोड येथील कृषि प्रदर्शनात सहभागी होण्याची सुवर्णसंधी  !

"औरंगाबाद/सिल्लोड, अखलाख देशमुख, : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने दिनांक १ ते ५ जानेवारी २०२३ या कालावधीत सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद येथे राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सव २०२३ आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवात शेतक-या करिता विविध योजना, शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान ,पिकांचे विविध वाण, शेतीची आधुनिक यंत्रे व औजारे ,ड्रोन तंत्रज्ञान, विविध कृषि अन्न प्रक्रिया व काढणी पश्चात तंत्रज्ञान ई बाबत माहिती,जिवंत देखावे,प्रात्यक्षिके प्रदर्शित करण्यात येणार आहेत. 

त्याचप्रमाणे शेती व संलग्न बाबत/शेती पूरक विविध विषयांची चर्चासत्रे आयोजित करण्यात आलेली आहेत. तांत्रिक सत्र दोन दालनामध्ये होणार असून दालन क्रमांक एक मध्ये सकाळच्या सत्रात दिनांक १  जानेवारी २०२३ रोजी श्री सुनील गोरंटीवार, संचालक संशोधन, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी हे शेतीसाठी ड्रोन चा वापर आणि तद अनुषंगाने नव्याने येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाची माहिती देणार आहेत.कृषि यांत्रिकीकरण व त्याचे महत्त्व या विषयावर डॉक्टर स्मिता सोळंकी,विभाग प्रमुख व संशोधन अभियंता पशु शक्तीचा योग्य वापर,परभणी या व्याख्यान देणार आहेत. दालन क्रमांक दोन मध्ये सोयाबीन ज्वारी पिकामधील मूल्यवर्धन या महत्त्वाच्या विषयावर डॉक्टर स्मिता घोडके मार्गदर्शन करणार आहेत.बदलते हवामान आणि त्या आधारित पीक लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉक्टर आनंद गोरे सकाळच्या सत्रात मार्गदर्शन करणार आहेत.

दिनांक २ जानेवारी २०२३ रोजी दालन क्रमांक १ मध्ये डॉक्टर एस.बी.पवार ,सहयोगी संचालक संशोधन, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, औरंगाबाद हे मका लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.या मध्ये शेतकर्यांना पिकाच्या सुधारित जाती,खत व्यवस्थापन व अधिक उत्पादन कसे काढता येईल याबद्दल माहिती मिळणार आहे.त्यानंतर श्री श्रीकांत कुवळेकर,वायदे बाजार तज्ञ लोकसत्ता व अग्रोवन हे मका पिकाचे आर्थिक व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन करणार आहेत ज्या योगे शेतकर्यांना मका पिकापासून जास्तीत जास्त उत्पन्नाची हमी मिळण्यास मदत होणार आहे.दुपारच्या सत्रात डॉक्टर अरविंद  पांडागळे, शास्त्रज्ञ , कापूस संशोधन केंद्र ,नांदेड यांचे कापूस लागवड तंत्रज्ञान या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. केळी,आंबा पिकाची काढणी पश्चात प्रक्रिया आणि निर्यात तसेच मत्स्य शेती व्यवसाय या विषयावर अनुक्रमे डॉ शिवाजी शिंदे,सहयोगी प्राध्यापक,उद्यानविद्या विभाग व .ना.म.कृ.वि.परभणी व डॉ प्रकाश शिनगारे,सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य ,मत्स्य महाविद्यालय,रत्नागिरी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

दिनक २ जानेवारी २०२३ रोजी राज्यस्तरीय मका पिक मुल्यसाखळी सहभाग धारकांची कार्यशाळा आयोजित केली आहे.ज्यायोगे शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादित माल विक्रीस व तसेच मका प्रक्रिया उद्योगांना चालना मिळणार आहे.
तरी सर्व शेतकरी बंधू व भगिनींना आवाहन करण्यात येते कि आपण अधिकाधिक संख्येने या महोत्सवात उत्स्फूर्त पणे सहभागी होवून विविध चर्चासत्रांचा लाभ घ्यावा असे डॉ डी.एल.जाधव ,विभागीय कृषि सह संचालक,औरंगाबाद यांनी आवाहन केले.

No comments:

Post a Comment

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...