कल्याण डोंबिवली सह उल्हासनगर शहर वाहतूक शाखेची दमदार कामगिरी, शेकडो वाहनांवर कारवाई !
कल्याण, (संजय कांबळे) : थर्टी फस्ट च्या पुर्वसंध्येला व थर्टी फस्ट दिवशी कल्याण डोंबिवली तसेच उल्हासनगर शहर वाहतूक शाखेने ड्रंक अँड ड्राईव्ह बाबत शेकडो कारवाई करून दमदार महसुल वसूल केला आहे. त्यामुळे अनेकावर चाफ बसला आहे.
दिनांक ३० व ३१ जानेवारी रोजी कल्याण डोंबिवली वाहतूक विभाग यांनी संयुक्त ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई करून कल्याण पश्चिम येथे ४९ वाहन चालकांवर कोळशेवाडी येथे 3५ मद्यपी वाहनचालकांवर व डोंबिवली येथे अठरा मद्यपी वाहन चालकांवर असे एकूण १०२ मद्यपी वाहन चालकांवर मोटर वाहन कायदा कलम १८५ अन्वये ड्रंक अँड ड्राईव्हच्या मोठ्या प्रमाणात दुचाकी चार चाकी वाहनांवर कारवाई करण्यात आल्या त्यामध्ये सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे तसेच एकूण बाराशे वाहने तपासली गेली कल्याणीतील महात्मा फुले चौक सुभाष चौक शिवाजी चौक या ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन तसेच डोंबिवली येथे शेलार नाका फडके रोड कोळशेवाडी टाटा नाका चक्की नाका इत्यादी ठिकाणी नाकाबंदी आयोजन केले होते तसेच इतर कारवाया विना हेल्मेट विना लायसन्स मोबाईल टॉकिंग गणवेश परिधान न करणे सीट बेल्ट न लावणे ब्लॅक फिल्म अशी कारवाई केली गेली.
याशिवाय विनाहेल्मेट ९१, मोबाईलवर बोलणे १३, विदाऊट सीटबेल्ट १८, विदाऊट लाईसन २६ आणि इतर २२०, अशी कारवाई करून सुमारे ३ लाख २८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
तर उल्हासनगर शहरवाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ३० आणि ३१ डिसेंबर रोजी ड्रंक अँड ड्राईव्ह च्या ३४ तर १८८ नुसार १४ कारवाई करण्यात आली.
कल्याण शहरवाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी वाहतूक अधिकारी,पोलीस, कर्मचारी, वार्डन यांच्या मदतीने स्वतः उपस्थित राहून ही कारवाई पार पाडली तर उल्हासनगर शहर वाहतूक शाखेचे वपोनी विजय गायकवाड यांनी,शहाड उड्डाणपूल, वालधुनी पुल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरु चौक, आदी ठिकाणी नाकाबंदी करून, वाहतूक अधिकारी, पोलीस, कर्मचारी आणि वार्डन यांच्या मदतीने ही कारवाई यशस्वरित्या पार पाडली. यावेळी अनेक वाहनचालकांचे प्रबोधन केले, वाहतूक नियमांचे पालन करण्याची विंनती केली.
ह
No comments:
Post a Comment