पत्रकार शांताराम गुडेकर यांची भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली संलग्न बृहन्मुंबई महानगर प्रदेशच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती !
मुंबई ,(सौ. मनस्वी म. मनवे ) :
भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली संलग्न बृहन्मुंबई महानगर प्रदेश (शहर) च्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत.राज्य अध्यक्ष पंढरीनाथ पवार व कार्याध्यक्ष दत्ताराम घुगे यांच्या आदेशानुसार मुंबई शहर अध्यक्ष म्हणून रामदास गजरे तर बृहन्मुंबई प्रसिद्धी प्रमुख म्हणून सामाजिक,शैक्षणिक, पर्यावरण तसेच पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून जवळ असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील आंगवली गावचे सुपुत्र श्री. शांताराम ल. गुडेकर (मा. विशेष कार्यकारी अधिकारी -महाराष्ट्र शासन) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय अनिल बबन कांबळे - बृहन्मुंबई कार्याध्यक्ष, अर्जुन पटेल -बृहन्मुंबई सह सचिव, पत्रकार भीमराव धुलप -मुंबई शहर सचिव, शरद बनसोडे -पश्चिम उपनगर जिल्हाध्यक्ष, अशोक उचलमुगले -पश्चिम उपनगर जिल्हा सचिव, पल्लवी थोरात -मुंबई शहर सह सचिव, संजय सोनावणे- पश्चिम उपनगर सह सचिव, विनायक इलग -मुंबई शहर सह सचिव, भूषण अहिर -मुंबई शहर संघटक, अशोक चिते -पश्चिम उपनगर सह सचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शांताराम गुडेकर यांच्या नियुक्तीमुळे त्यांच्या अनुभवाचा उपयोग दलित साहित्य अकादमी ला नक्की होईल असे अध्यक्ष पंढरीनाथ पवार यांनी सांगितले. गुडेकर यांचे या नियुक्तीमुळे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.त्यांच्या या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा व मनपूर्वक अभिनंदन.
No comments:
Post a Comment