पैसा झाला मोठा हात कापलेल्या बाळाचा अहवाल आला खोटा..
*बाळाला न्याय न मिळाल्यास मंत्रालय समोर आई करणार आत्मदहन*
वसई, प्रतिनिधी : नालासोपारातील अंजली वाला यांच्या जन्मतः बाळावर त्रीवेणी हॉस्पिटलने चुकीचे उपचार केल्याने या जन्मतः बाळाला आपला हात गमवावा लागला. याप्रकरणी नालासोपारा पोलिस स्टेशन मधुन सर्व कागदपत्रे चौकशी साठी पालघरचे शल्यचिकित्सक संजय बोदाडे यांच्याकडे पाठवण्यात आले होते. वेळोवेळी शल्यचिकित्सक यांच्याकडून कारवाई करू असे आश्वासन कुटूंबाला देण्यात आले होते. शल्यचिकित्सक यांनी त्रिवेणी हॉस्पिटल सोबत संगनमत करून अहवाल बनवला. असा आरोप बाळाच्या आईने केला आहे.
अंजली वाला या त्रिवेणी हॉस्पिटल येथे 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. त्यांनी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. यावेळी दोन्ही बालके निरोगी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र एका बाळाची शुगर कमी असल्याचे सांगत डॉक्टरांनी त्याला सलाईन लावले आणि थोड्याचवेळात बाळाचा हात पुर्ण काळा पडत गेला याबाबत अंजली वाला यांनी डॉक्टरांना विचारणा केली असता त्यांनी हे किरकोळ आहे लोशन लावुन मॉलिश केल्यास ठिक होईल असे सांगण्यात आले.
बाळाच्या तब्येतीत कुठलीही सुधारणा होत नसल्याने पालकांनी बाळाला वाडिया हॉस्पिटल येथे नेले यावेळी बाळाच्या हाताला गँगरींग झाले असल्याचे सांगत बाळाचा पुर्ण हात कापला. याबाबत शल्यचिकित्सक संजय बोदाडे यांनी त्रिवेणी हॉस्पिटल वर केलेले आरोप पुर्णपणे चुकीचे आहे.असा अहवाल तयार केला. तसेच त्रिवेणी हॉस्पिटल सोबत संगनमत करून आर्थिक देवाण घेवाण करून अहवाल बनवण्यात आला. असा आरोप पालकांनी केला आहे. त्रिवेणी हॉस्पिटल ने केलेल्या चुकीच्या उपचारांवर उच्च स्तरीय समिती स्थापन करून चौकशी करण्याबाबत आरोग्यमंत्री, आरोग्य अधिकारी, आरोग्य सभापती, पोलीस आयुक्त, उपआयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार केला असुन बाळाला लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास मंत्रालय समोर आत्मदहन करण्याचा इशारा आई अंजली वाला यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment