Monday, 16 January 2023

थंडीमुळे कल्याण तालुका गारटला तर सर्दी तापामुळे फणफला, घरोघरीं आजारपण, दवाखाने हाऊसफुल्ल ?

थंडीमुळे कल्याण तालुका गारटला तर सर्दी तापामुळे फणफला, घरोघरीं आजारपण, दवाखाने हाऊसफुल्ल ?

कल्याण, (संजय कांबळे) : गेल्या दोन तीन दिवसापासून तालुक्यात गारवा वाढला असतानाच आता पुन्हा हवामान खात्याने मुंबई परिसराचा पारा अजूनही खाली घसरेल असा इशारा दिला आहे. यामुळे उपनगरात थंडी वाढली आहे यामुळे सर्दी, ताप, खोकला या आजाराचे पेंशट मोठ्या प्रमाणात वाढले असून घरोघरी ही साथ सुरू असल्याने सरकारी सह खाजगी दवाखाने मात्र हाऊसफुल्ल होत आहे.

काही दिवसांपासून वातावरणात विचित्र असा बदल होत आहे, कधी भयानक उकडा, मध्येच पावसाळी ढगाळ वातावरण, थंडी यामुळे आजारपणाला निमंत्रण दिले जात आहे. अशातच मुंबई चा पारा अजून खाली येवून थंडीची लाट येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे कल्याण तालुक्यात गारवा वाढला आहे, शहरी भागातील म्हारळ, वरप कांबा, टिटवाळा, मोहिली, मोहना, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आदी ठिकाणी ही थंडी जाणवत नसली तरी तालुक्यातील उल्हास, बारवी, काळू आणि भातसा या बारमाही वाहणाऱ्या नद्या आणि यांच्या काठावरील आपटी, मांजर्ली, दहागाव, मानिवली, रायते, सांगोडा, वासुद्री, आमना,पिसा, गुरवली, खडवली, तसेच जंगलभागात असणारे चौरे, म्हसरोंडी, मामणोली, कोलणी कोलब, रुंदा, फळेगाव, भोंगाळपाडा, उशीद, पळसोली, गेरसे, कोसले, शेरे, आंबार्जे, निंबवली,आदी गावात थंडी चा फटका जाणवत आहे.

या बदलत्या वातावरणामुळे कल्याण तालुका गारटला असला तरी सर्दी, ताप, खोखला यामुळे मात्र फणफला आहे. अगदी घरोघरी याचे पेंशट असून, एकमेव गोवेली ग्रामीण रुग्णालयात दररोज, १०० ते  १५० ओपीडी होत आहे, तर तालुक्यातील दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्र, खडवली व निळजे या प्राथमिक आरोग्य केंद्रात ८०/९० वर ओपीडी जात आहे.यावरून ही साथ किती झपाट्याने वाढत आहे हे दिसून येत आहे.

याचा फायदा खाजगी दवाखाने उचलत आहेत, अव्वाच्या सव्वा फी उकळून शेकडो रुपयांची बाहेरील औषधे लिहून दिली जात आहेत. यामुळे त्यांच्या मेडिकल ला देखील सुगीचे दिवस आले आहेत.

तर थंडीत गावोगावी पेटणा-या शेकोट्या दिसेनासे झाल्या आहेत. याबाबतीत सांगे गावचे सामाजिक कार्यकर्ते विनोद जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, पंतप्रधान मोदी साहेबांनी घरगुती गँस दिले, परंतु सिलेंडर १ हजाराच्या वर गेला, जंगलातून लाकूड आणावे तर वनविभाग कारवाई करतो त्यामुळे शेकोट्या दुर्मिळ झाल्या आहेत.

दरम्यान या व्हायरल साथीविषयी कल्याण पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ भारत मासाळ यांना विचारले असता ते म्हणाले, की ही व्हायरल साथ आहे, चारपाच दिवस राहणार, त्यामुळे सर्दी, तापाचा पुरेसा औषधे साठा प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात दिला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, परंतु काळजी घ्यावी, आपला घर, व आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. शक्यतो पाणी उकळून प्यावे असे अवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...