Monday, 16 January 2023

भिवंडीत पतंगाच्या मांजाने उल्हास नगर मधील दुचाकीस्वाराचा मृत्यू, तर नागपूरमध्ये दोघा विद्यार्थ्यांचा मृत्यू !

भिवंडीत पतंगाच्या मांजाने उल्हास नगर मधील  दुचाकीस्वाराचा मृत्यू, तर नागपूरमध्ये दोघा विद्यार्थ्यांचा मृत्यू !

भिवंडी, दि,१६,अरुण पाटील (कोपर) :
             मकर संक्रातीच्या दिवशी भिवंडीतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाण पुलावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या गळयात उडत्या पतंगाच्या मांजा अडकून गळा कापल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असतानाच अश्याच प्रकारे नागपूरमध्ये मांज्याने दोन विद्यार्थ्यांचा गळा कापून दुर्दैवी घडली आहे.
              संजय हजारे (वय ४७, रा. उल्हासनगर ) असे मांज्यामुळे अचानक गळा कापल्याने मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मृतक संजय हे उल्हासनगर मधील तीन नंबर भागात कुटूंबासह राहत होते. आज मकर संक्रातच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास भिवंडीतून काम आटपून ते उल्हास नगर येथील घराच्या दिशने भिवंडीतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाण पुलावरून दुचाकीने निघाले होते. 
             याच दरम्यान एका उडत्या पतंगाच्या मांजा अचानक त्यांच्या गळ्याला लागून त्यांचा गळा कापल्या जाताच, त्यांचे दुचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळल्याने त्यांचा जागीच मुत्यू झाला. घटनेची माहिती भिवंडी पोलीस पथकाला मिळताच पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत संजय यांचा मुत्यूदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून घटनेचा तपास सुरू केला आहे.
              अश्याच प्रकारे नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाचव्या इयत्तेत शिकणारा वेद शाहू (११) हा आपल्या वडिलान बरोबर ॲक्टिवा स्कूटरवर पुढे बसून जात असताना पतंगाचा मांजा गळ्याला अडकून गळा कापल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.तर दुसऱ्या घटनेत धंतोली पोलीस पोलीस ठाण्याच्या कुंभार पोलीस परिसरात राहणारा वंश प्रविण धुर्वे (१३) हा रेल्वे रुळावर खेळत असताना कापलेली पतंग पकडण्याच्या नादात रेल्वे रुळात पाय अडकल्याने समोरून आलेल्या रेल्वेच्या धडकेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
            चायना मांज्यावर बंदी असतानासुद्धा पतंग उडविण्यासाठी चायना मांज्याचा वापर होत आल्याचे विवीध घटनेवरून दिसून आले आहे. दरवर्षी मकरसंक्रात सणाला पतंग उडविताना अश्या प्रकारे विविध दुर्दैवी घटना घडत असतात.त्या मुळे चायना मंज्यावर बंदी आलीच पाहिजे. 
               काही वर्षांपूर्वी पर्यंत पतंग उडवण्यासाठी साध्या, सुती दोऱ्याचा वापर केला जात होता. मात्र, हा दोरा तुटत असल्याने आणि स्पर्धांमध्ये विरोधकांचा पतंग कापण्यासाठी, आपला पतंग सुरक्षित राहण्यासाठी चीनी किंवा नायलॉनच्या मांजाचा वापर वाढला. नायलॉनच्या दोऱ्यावर डिंकाचा वापर करून काचेचा चुरा लावण्यात येतो. हा दोरा सहजासहजी तुटत नाही. हा दोरा दुचाकीस्वाराच्या गळ्याभोवती अडकल्यास गळा चिरण्याचा धोका असतो.
            यापूर्वी कल्याण, भिवंडी, उल्हासनगर शहरातील मांजा विक्रेत्यावर गुन्हा दाखल झाले. तरी देखील मांजामुळे अश्या अपघाताच्या घटना घडतच असल्याने मांजा विक्रेत्याचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...