कल्याण भिवंडी आणि शहापूर मधील पाणी योजनासाठी सुमारे चारशे पंचेचाळीस कोटी, मात्र भांडणामुळे 'हर घर में नल, नल से जल', कसे शक्य ?
कल्याण, (संजय कांबळे) : १५आँगस्ट२०१९मध्ये देशाच्या पंतप्रधानांनी प्रत्येक राज्यातील ग्रामीण भागात हर घर मे नल, और नल से जल अशी घोषणा केली होती. यानुसार जलजीवन मिशन मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. एकट्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी आणि शहापूर तालुक्यातील पाणी योजनाकरिता तब्बल ४४५ कोटी रुपयांची तांत्रिक तसेच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र कामाचा ठेका मलाच पाहिजे, माझ्या जागेतून लाईन जाऊन देणार नाही आदी विविध कारणांमुळे गावोगावी 'भांडणे' सुरू असल्याने जलजीवन मिशनचा हेतू साध्य होणार का ? की पुन्हा मानवनिर्मित पाणी टंचाई निर्माण होणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्याना दरवर्षी पाणी टंचाई ला सामोरं जावं लागते. यासह कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यात देखील कमी अधिक प्रमाणात पाणी टंचाई जाणवते, प्रत्येक वर्षी टंचाई कृती आराखडा मध्ये लाखो रुपयांची तरतूद केली जाते. परंतु पाणी टंचाई काय दूर होत नाही. शहापूर तालुक्यात तर आतापासून नारळवाडी, पारधवाडी, चिंतामण वाडी, जरंडी, गोलभण, भुईपाडा, अजनुप, कोळीपाडा, वारलीपाडा अशा ८ गावपाड्यानी टँकरची मागणी केली आहे.
सन २०२१/२२ मध्ये टंचाई आराखडा ६३०:९२ लक्ष रुपये मंजूरी मध्ये ९४ गावे व ३५६ पाडे याचा सहभागी झाले होते. यातील ३२ पाडे व १३७ अशा एकूण १६९ गावपाड्याना २५ टँकर व्दारे पाणी पुरवठा केला होता. याकरता अंदाजे २,१० कोटी रुपये खर्च झाले होते.
आता सन २०२२/२३ या वर्षासाठी सुमारे ५ हजार १८,२५ इतकी तरतूद आराखड्यात केली आहे. यात २२८ गावे ४३७ पाडे असे ६६५ गावपाड्याचा समावेश आहे. हे केवळ शहापूर तालुक्याची परिस्थिती आहे. बाकी कल्याण, मुरबाड, भिवंडी, आणि अंबरनाथ हे तालुके दुरच ?
विशेष म्हणजे ऐवढया उपाययोजना करुन, लाखो, कोटी रुपयांची उधळण करून ही महिलांच्या डोक्यावरील हंडा काय सुटत नाही. हे सर्व टाळण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ आँगस्ट २०१९ रोजी जलजीवन मिशन अंतर्गत हरघरमे नल, और नल से जल अशी घोषणा केली. त्यांची अंमलबजावणी देखील सुरू झाली.
यानुसार ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यासाठी तब्बल २२५ कोटी, भिवंडी १७५ कोटी तर कल्याण करिता ४५ कोटी रुपयांच्या पाणी योजनांच्या कामाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली. काही ठिकाणी ठेकेदारांने कामेही सुरू केली. परंतु इतर गावात काम मलाच पाहिजे, माझ्या जागेतून घेऊ देणार नाही, यावरून तसेच गावा गावातील राजकारण यामुळे शहापूर तालुक्यातील मढ येथे तर 'मामला, पोलीस ठाण्यापर्यंत गेला, त्यामुळे पाणी योजना रखडल्या जाणार ? अशातच काही ठेकेदार मुद्दाम काम संथगतीने करत असून अशा ठेकेदाराला'काळ्या यादीत टाकण्याचे काम झेडपी करत आहे. एकूणच काय तर गावोगावी अशीच भांडणे सुरू राहिली तर यावेळी देखील पाणी टंचाई हमखास निर्माण होणार ? मग जलजीवन मिशन चे काय ? लोकप्रतिनिधी का अशा लोकांना समजावून सांगत नाही, याचा विचार करावा ? याबाबत ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे यांना विचारले असता ते म्हणाले, ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण करायला हवे, जिथे अडचण येईल तेथे पोलिसांची मदत घेतली जाईल.
No comments:
Post a Comment