Wednesday, 18 January 2023

'कोविड लसीचे दुष्परिणाम' उघड - सरकारने आरटीआय अंतर्गत दिली माहिती !

'कोविड लसीचे दुष्परिणाम' उघड - सरकारने आरटीआय अंतर्गत दिली माहिती !

मुंबई, (गुरुदत्त वाकदेकर) : २०२० मध्ये देशात पसरलेल्या कोविड आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोरोना लस भारतात १६ जानेवारी २०२१ पासून देण्यास सुरुवात झाली. या कोरोना लसीचेही दुष्परिणाम असल्याचे सरकारने माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नांवर मान्य केल्याचे उघड झाले आहे.

पुण्यातील व्यावसायिक प्रफुल्ल सारडा यांनी देशात दिलेल्या कोरोना लसीबाबत माहिती अधिकाराअंतर्गत सरकारकडून माहिती मागवली होती. सरकारने आरटीआय अंतर्गत धक्कादायक माहिती दिल्ली आहे. यावर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि सेंट्रल ड्रग्ज स्टैंडर्ड कंट्रोल ऑर्गनाइझेशनने उत्तरं दिली आहेत. आयसीएमआर व सीडीएससीओने दिलेली उत्तरे अत्यंत धक्कादायक असल्याचे सारडा म्हणाले.

भारतात अॅस्ट्राझेनका आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड, पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटची कोव्होव्हॅक्स, हैदराबादच्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅबमार्फत मिळत असलेली रशियाची स्पुतनिक व्ही, बायोलॉजिकल ई लिमिटेडची कोर्बेव्हॅक्स तर अहमदाबादच्या कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडची झायकोव्ह-डी (फक्त १२- १७ वयोगटातील मुलांसाठी) दिली जाते. 

या सर्व संभाव्य दुष्परिणामांची पुरेशी प्रसिद्धी माध्यमांद्वारे, रुग्णालये, लसीकरण केंद्रांद्वारे केली गेली आहे की नाही आणि आरोग्य मंत्रालयाने लसीमुळे होणार्‍या मृत्यूबद्दल लोकांसाठी सार्वजनिक सुरक्षा मोहिमा सुरू केल्या आहेत का, याची आकडेवारी जाहीर करण्याचे त्यांनी सरकारला आवाहन केले.

*कोणत्या लसीचे किती आणि कोणते दुष्परिणाम*

कॉव्हिशिल्ड : इंजेक्शन दिलेल्या जागी सूज, वेदना, लालसरपणा, कोणत्याही कारणाशिवाय उलटी होणे, वारंवार ओटीपोटात तीव्र वेदना, उलटी किंवा उलटीशिवाय डोकेदुखी, श्वास घ्यायला त्रास, छातीत वेदना, हातापायांना सूज, वेदना, शरीराचा एखादा भाग लकवाग्रस्त होणे, डोळ्यात वेदना.

कोव्होवॅक्स : इंजेक्शन दिलेल्या जागी सूज, वेदना, जडसरपणा, लालसरपणा, खाज, रॅशेस, थकवा डोकेदुखी, ताप, स्नायूंमध्ये वेदना, सांधेदुखी, मळमळ, उलटी, अंगदुखी, पायात वेदना, अशक्तपणा, पाठदुखी, चक्कर येणे.

कोव्हॅक्सिन : इंजेक्शन दिलेल्या जागेवर सूज, वेदना, डोकेदुखी, थकवा, ताप, अंगदुखी, ओटीपोटात वेदना, मळमळ, उलटी, चक्कर, गरगरल्यासारखं होणं, घाम येणं, सर्दी-खोकला

स्पुतनिक व्ही :  इंजेक्शन दिलेल्या जागेवर वेदना, सूज, थंडी लागणे, ताप, डोकेदुखी, सांधे धरून येणे, सांध्यात वेदना, अस्वस्थ वाटणे, मळमळ, भूक न लागणे, अपचनासारख्या समस्या.

कोर्बोव्हॅक्स : ताप, डोकेदुखी, थकवा, अंगदुखी, मळमळ, थंडी, अशक्तपणा, सुस्तपणा, इंजेक्शन दिलेल्या जागेवर वेदना, सूज, रेंश, त्वचेवर रॅशेस

1 comment:

पत्रकार पंकजकुमार पाटील यांना 'समाजभूषण' आणि निर्भीड जागल्या हे दोन पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान !!

पत्रकार पंकजकुमार पाटील यांना 'समाजभूषण' आणि निर्भीड जागल्या हे दोन पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान !! मुंबई, प्रतिनिधी : द...