Tuesday, 17 January 2023

शेतकऱ्यांना मिळणार फळ पिक विम्याचा लाभ - 'खासदार श्रीमती रक्षाताई खडसे'

शेतकऱ्यांना मिळणार फळ पिक विम्याचा लाभ - 'खासदार श्रीमती रक्षाताई खडसे'

*प्रति हेक्टर मिळणार रु.२६,५००/- लाभ*

जळगाव, अखलाख देशमुख, दि १८ : पुर्नरचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२२-२३ (आंबिया बहार) अंतर्गत दि.१३ जानेवारी २०२३ पर्यंतच्या महावेध माहिती (डेटा) नुसार जळगांव जिल्ह्यातील ४९ महसूल मंडळात सलग ३ दिवस किमान तापमान ८ डिग्री सेल्सियस व त्यापेक्षा कमी राहिल्याने; जिल्ह्यातील केळीला तापमानाचा फटका बसून असेन शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. सदर शेतकऱ्यांना रु.२६,५००/- प्रमाणे नुकसान भरपाई मंजुर होणार आहे. अशी माहिती खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिली.

पुर्नरचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२२-२३ (आंबिया बहार) अंतर्गत दि.१३ जानेवारी २०२३ पर्यंत कमी तापमानामुळे झालेल्या नुकसान भरपाईस पात्र जळगांव जिह्यातील तालुका व महसूल मंडळे खालील प्रमाणे.

*रावेर लोकसभा क्षेत्र*

१. *भुसावळ* : पिंपळगांव
२. *बोदवड* : बोदवड, करंजी, नाडगांव
३. *चोपडा* : अडावद, चोपडा, धानोरा, गोरगावले, हातेड
४. *जामनेर* : जामनेर, मालदाभाडी, नेरी
५. *मुक्ताईनगर* : अंतुर्ली, घोडसगांव, कुऱ्हा
६. *रावेर* : खानापूर, खिर्डी, खिरोदा, निंभोरा, रावेर, सावदा
७. *यावल* : बामणोद, भालोद, फैजपूर, किनगांव, साखळी, यावल

*जळगांव लोकसभा क्षेत्र*

१. *अमळनेर* : अमळगाव, अमळनेर, भरवस, मारवड, नगाव, पातोंडा, शिरुड
२. *भडगाव* : आमडदे, भडगाव, कजगांव, कोळगाव.
३. *चाळीसगाव* : बहाळ
४. *धरणगाव* : चांदसर, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद
५. *एरंडोल* : उत्रान
६. *जळगाव* : भोकर, म्हसावद, नशिराबाद, पिंप्राळा

No comments:

Post a Comment

भूखंडाचे आमिष दाखवून गुंतवणूक दारांची ५७ लाखांची फसवणूक !!

भूखंडाचे आमिष दाखवून गुंतवणूक दारांची ५७ लाखांची फसवणूक !! उरण मध्ये फसवणूक करून जमीन विक्री करणारी बनावट टोळी सक्रिय. सीबीडी पोलीस ठाण्यात ...