माळशेज घाटाच्या कुशीत वसलेल्या पाच जिल्हा परिषद शाळेतील आदिवाशी विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीकडून गणवेश वाटप ! कौतुकास्पद कामगिरी !!
कल्याण, (संजय कांबळे) : २६जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला मुरबाड तालुक्यातील व निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या माळशेज घाटाच्या कुशीत वसलेल्या जि प शाळा फांगुळगव्हाण, निरगुडपाडा, साखरवाडी, सावर्णे आणि जिल्हा परिषद शाळा थितबी अशा ५ शाळेतील
विद्यार्थ्यांना नुकतेच गणवेशाचे वाटप करण्यात आले.यामुळे गणवेश घातल्यानंतर या 'रांगड्या,मुलांचा आंनद गगनात मावेना असा दिसत होता.
ग्रामपंचायतीचा 'कारभारी, चांगला असेल तर काय होऊ शकते, हे आजच्या उदाहरणावरुन दिसून येते, फांगुळगव्हाण व सावर्णे या ग्रामपंचायत हद्दीत नैसर्गिक सौंदर्याने नटलेला माळशेज घाट येतो, येथे देशविदेशातील पर्यटक येत असले तरी येथील आदिवासी समाज आजही डोंगरद-या, कडेकपारी आशा वाड्यावस्त्यामध्ये वसलेला आहे. यांच्या पर्यंत शासनाच्या सोईसुविधा पोहचणे म्हणजे मोठे दुर्लभ? पण मुरबाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे व विस्तार अधिकारी गजानन शिरोसे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीचे कर्तव्यनिष्ठ ग्रामसेवक बाळू कोकणे व त्यांच्या ग्रामपंचायत कमिटी यामध्ये सरपंच सविता रवींद्र भला, उपसरपंच राजू आंबो भला, सदस्य मनिषा किरन कारभळ, लक्ष्मी शंकर भला, तानाजी देऊ भला, दगडाबाई कल्पेश खाकर, विमल सोनू पोकळा, विठ्ठल कावजी भला, पांडुरंग शंकर साबळे, आणि मंदा गणेश सांगडे या सर्वांनी आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषदेच्या ५ शाळेतील विद्यार्थ्यांना या प्रजासत्ताक दिनी गणवेशात उभे करायचे व गणतंत्र दिन साजरा करायचा निश्चय केला. आणि ताबडतोब जिप शाळा फांगुळगव्हाण, निरगुडपाडा, साखरवाडी, सावर्णे व थितबी या शाळेतील सुमारे १२७ विद्यार्थ्यां नागणवेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
इतरवेळी रानावनातून जंगलातून उघडी नागडी अनवाणी फिरणारी ही मुले आज गणवेशात भलतीच 'भाव खाऊन, मिरवत होती. तशी भावना गावातील ग्रामस्थ शंकर भला यांनी बोलून दाखवली.
ग्रुप ग्रामपंचायत फागुंळगव्हाण अंतर्गत ३ महसुली गावे व ५ पेसा गावाचा समावेश होतो गावांची लोकसंख्या १ हजार ७८९५ इतकी आहे. या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बाळू कोकणे यांच्या कार्यकुशलतेमुळे मागील वर्षी कल्याण पंचायत समिती चा तालुका पातळीवरील १० लाख तर ठाणे जिल्हा परिषदेचा सुमारे ४० लाखाचा "स्मार्ट ग्राम" हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता, इतकेच नव्हे तर याच तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायत हद्दीत केलेली विविध विकास कामे आजही त्यांच्या कार्याची साक्ष देत आहेत. त्यामुळे उद्याच्या प्रजासत्ताक दिनी ही आदिवासी मुल मुली सुंदर अशा गणवेशात तिरग्यांला कडक अशी सलामी देणार ऐवढे निश्चित !
यावेळी गावातील शंकर भला, किरन ,रवींद्र भला, कांताराम भला, प्रकाश खाकर, तसेच शाळेचे शिक्षक, शिपाई पांडुरंग तेलम, आपरेटर प्रभू दरवडा आदी ग्रामस्थ उपस्थित होते. एकूणच फांगुळगव्हाण व सावर्णे ग्रामपंचायतीचे हे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.
No comments:
Post a Comment