Wednesday, 25 January 2023

मुंबईतील जयेश ट्रेनिंग क्लासेसच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड !

मुंबईतील जयेश ट्रेनिंग क्लासेसच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड !

मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :

              जिल्हास्तरीय स्पर्धा नुकतीच रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामध्ये पार पाडली. यामध्ये मुंबईच्या जयेश ट्रेनिंग क्लासेसच्या खेळाडूंनी मुख्य प्रशिक्षक जयेश वेल्हाळ आणि सहप्रशिक्षक कामेश कदम यांच्या मार्गदरशनाखाली क्यूरोगी या प्रकारात सहभाग घेतला होता, ह्या स्पर्धेत खेळाडूंनी आपली चमक दाखवत सुवर्ण पदकांची कमाई केली. यावेळी सुवर्ण पदक विजेते खेळाडू सिद्धी लांगी ( ५२ किलोखाली ), शाकीर अली खान ( ४८ किलोखाली ), अभिषेक इर्लेकर ( ६८ किलोखाली ) या सर्व खेळाडूंची निवड झाली असून ते रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व ३२ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय ज्युनिअर तायक्वांडो स्पर्धेमध्ये करणार आहेत. ही स्पर्धा दिनांक २६ ते २८ जानेवारी २०२३ दरम्यान,श्री.छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव या ठिकाणी संपन्न होणार आहे. या सर्व खेळाडूंचे, पालकांचे आणि प्रशिक्षक कमेश कदम यांचे जयेश ट्रेनिंग क्लासेसचे प्रमुख मास्टर जयेश वेल्हाळ यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न "

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न " सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त...