येत्या रविवारी मुलुंड पश्चिमेला हौसिंग सोसायट्यांवर मोफत मार्गदर्शन शिबीर !
मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर) :
मुलुंडमध्ये येत्या रविवारी २९ जानेवारी २०२३ रोजी हौसिंग सोसायट्यांवर मोफत मार्गदर्शन,जाणवणाऱ्या समस्या, या क्षेत्रात नोकरीच्या संधी व व्यवसाय यावर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी या क्षेत्रातील तज्ञ संतोष (भाई) पालव मार्गदर्शन करतील. सदर शिबीर पुरंदरे हायस्कुलमध्ये सकाळी १० वाजता होईल. फक्त ६० जणांना यासाठी प्रवेश दिला जाईल. सदर शिबिर मराठी भाषेत होणार आहे.प्रवेशासाठी नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी 9022747507 या नंबरवर इच्छुकांनी संपर्क साधावा. हे शिबिर पुरंदरे हायस्कुल-सार्वजनिक शिक्षण संस्था, वि.पी रोड, मुलुंड(पश्चिम), मुंबई येथे होणार असून कोकणवृत्तसेवा या शिबिराचे आयोजक आहेत.
No comments:
Post a Comment