बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतिने नालासोपारा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा...
वसई, प्रतिनिधी : पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रविंद्र फाटक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर यांच्या सहकार्याने तालुकाप्रमुख सुदेश चौधरी यांच्या उपस्थितीत उपतालुका प्रमुख अजित भाऊ खांबे यांनी
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने नालासोपारा शहरात दोन दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवुन बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यामध्ये दिनांक 22/01/2023 रोजी रक्तदान शिबीर, मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप, रेल्वे प्रवासी भजन मंडळ स्पर्धा, 20 भजन मंडळानी सहभाग घेतला होता.
वाढदिवसाच्या दिवशी ई श्रम कार्ड व आभा कार्ड शिबीर तसेच महिलांसाठी खास हळदी कुंकू समारंभ विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते नागरीकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन उपक्रमांचा लाभ घेतला यावेळी शहरप्रमुख सुभाष सावंत भोसले, उपशहरप्रमुख श्रीधर मर्चंडे, श्रीकांत शिंदे, शहर सचिव राजेश उत्तेकर, शहर प्रमुख राजेंद्र रांजने, विभागप्रमुख पांडुरंग भोसले, गणेश शेलार, प्रशांत टेलर उपविभाग प्रमुख नवनाथ राहुल, महिला आघाडी वैभवी गुप्ता, शाखा संघटक सुनिता मोहिते, अर्चना भुवड उपस्थित होते.
No comments:
Post a Comment