Tuesday, 24 January 2023

विद्यामंदिर मांडा १९९६-९७ च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठया उत्साहात संपन्न !

विद्यामंदिर मांडा १९९६-९७ च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठया उत्साहात संपन्न !

*सिने अभिनेता कुशल बद्रिके यांची उपस्थिती*

*थ्री स्टार राजा हॉटेल कल्याण येथे पार पडले संमेलन*

कल्याण, संदिप शेंडगे : विद्यामंदिर मांडा टिटवाळा १९९६-९७ च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदाच्या वातावरणात संपन्न झाले.

कल्याण येथील थ्री स्टार राजा हॉटेल येथे हे संमेलन रविवारी पार पडले. या संमेलनाला माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली तसेच विद्यामंदिर मांडा या शाळेचे विद्यार्थी तब्बल २६ वर्षानंतर एकत्र भेटले. या संमेलनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील सिने अभिनेता झी टीव्हीवरील चला होऊ द्या या शो मधील 'प्रमुख कलाकार कुशल बद्रिके' उपस्थित होता.

*दिल दोस्ती दुनियादारी या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून झाली पुन्हा मैत्री*

दिल दोस्ती दुनियादारी या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून १९९६ च्या दहावीतील प्रसाद नानल, दीपक जोशी, निलेश मसने, प्रसाद, सीमा वाणी, नम्रता या विद्यार्थ्यांनी आपल्या ओळखीतील सर्व मित्रांना ग्रुप वर ऍड करायला सुरुवात केली. प्रत्येक जण ग्रुपवर जोडत गेला हळूहळू दहा संख्या झाली दहा वरून तीस पर्यंत हा आकडा गेला त्यानंतर साठ संख्या झाली प्रत्येकजण आपल्या जुन्या आठवणी ग्रुपवर शेअर करत होते. काही जण जुने फोटो, स्वतःचे टेटस माहिती एकमेकाची विचारपूस ग्रुप वर करत होते 

यातून आपण सर्वांनी एकत्र भेटले पाहिजे अशी काहींनी इच्छा व्यक्त केली याला सर्वच विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देत आपण भेटलोच पाहिजे अशी मागणी केली, दत्ताने आपले एक संमेलन झाले पाहिले असे मत मांडले. सर्वांनी त्याला होकार दिला आणि बघता बघता थेट संमेलनाचीच तयारी सुरू झाली.
संमेलनाचे ठिकाण सर्वांना सोयीस्कर व्हावे, मुलींनाही येता यावे याकरिता कल्याण शहरा जवळील थ्री स्टार राजा हॉटेल सुचविण्यात आले सर्वांनी राजा हॉटेलला 22 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता एकत्र भेटायचे असेल ठरले. सर्वजण ठरलेल्या वेळेत सकाळीं अकरा वाजता हॉलमध्ये जमा झाले. लहानपणापासून आपण एकत्र वर्गात खेळलो बागडलो आणि 26 वर्षानंतर एकत्र भेटल्याने सर्वांना खूप भरभरून आले होते परंतु चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. सर्वजण एकमेकांशी विचारपूस करत होते. तू काय करतो ? तू कुठे राहतो ? आता काय करतो ? लग्न झाले का ? मुले किती ? बायको काय करते ? अरे ती भेटली होती का ? अरे तो दिसला का ? अरे तो का आला नाही ? ती आता काय करते ? तो आता काय करतो असे प्रश्न एकमेकांना आत्ताची चाळिशी ओलांडलेली मुले आणि मुली प्रत्येकाला विचारत होती ?
एकमेकांशी चर्चा चालूच होती इतक्यात दत्ताने सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. चक्क आपल्याबरोबर मराठी सिने अभिनेता चला हवा येऊ द्या या झी टीव्ही मालिकेतील प्रमुख विनोदी कलाकार कुशल बद्रिके साक्षात आमच्या समोर संमेलनामध्ये उपस्थित पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आणि एकच जल्लोष सुरू झाला मग काय कुशल बद्रिके आणि दत्ता हे एकमेकांचे अगदी जवळचे लहानपणीचे मित्र असल्याचे ऐकून खूपच आनंद झाला. मग काय दिलखुलास मैत्रीला सुरुवात झाली आणि कुशल बद्रिके याने दत्ता सोबत असलेल्या मैत्रीचे अनेक किसे सांगितले. हे किस्से ऐकून मुला मुलींना खूप हसविले उपस्थित विद्यार्थ्यांनी कुशल बद्रिकेला अनेक प्रश्न विचारले त्याला त्याने हसतमुखाने छान उत्तरे दिली. कुशलने एक सुंदर अशी कविता सादर केली. दत्ता जो आपल्याबरोबर खेळला वाढला मोठा झाला तो एवढ्या मोठ्या सिने अभिनेत्याचा मित्र आहे हे पाहून सर्वांना गर्व वाटला. हम भी किसी से कम नही असे म्हणत सर्वांचे छाती गर्वाने फुलली. 

मग सुरू झाल्या गप्पागोष्टी आणि गाण्याला सुरुवात झाली दत्ताने ऑर्केस्ट्रा मागवून घेतला होता ऑर्केस्ट्रा बरोबर अनेकांनी मराठी हिंदी चित्रपट गाणी मनमुराद गायली अनेकांमध्ये गाण्यांचा गुण आहे छान गळा आहे हे त्या दिवशी समजले. गाणे झाले धमाल मस्ती केली. त्यानंतर सुरू झाला खेळ हिंदीतली गाणी मराठीतून ओळखण्याचा या खेळात सर्वांनी हीरीहीरीने भाग घेतला खूप धमाल मस्ती केल्यानंतर जेवणावर ताव मारत सर्वांनी भरपेट जेवणाचा आनंद लुटला. चायनीज मराठी साउथ इंडियन अशा विविध पद्धतीचे वेगवेगळे डिशेस तसेच गाजराचा हलवा सोबत आईस्क्रीम खाऊन सर्वांचे तोंड गोड झाले.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सुधांशू गोंधळेकर, धनंजय गायकवाड, आशिष पारखे, केतन कान्हेरे, दीपक जोशी, सीमा वाणी, लक्ष्मी धारा, सचिन झुंजारराव, सुहास तुपे, मुकेश भाटिया, गणेश सातार्डेकर, दत्तात्रय पांडव, निलेश मसने, विनोद शिंदे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतन कान्हेरे सीमा वाणी आणि लक्ष्मी धारा यांनी केले.

No comments:

Post a Comment

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न "

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न " सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त...