Tuesday, 3 January 2023

भिवंडीत चंद्रशेखर बावनकुळे व कपिल पाटील यांच्या बाईक रॅलीला उत्स्फूर्त पाठिंबा !

भिवंडीत चंद्रशेखर बावनकुळे व कपिल पाटील यांच्या बाईक रॅलीला उत्स्फूर्त पाठिंबा !

भिवंडी, दि,३, अरूण पाटील(कॉपर) :
        भिवंडीत आज दि,( ३/१/२०२३) रोजी निघालेल्या भाजपच्या बाईक रॅलीला तरुणांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याचे दिसून आले असून या भाजप  बाईक रॅलीत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे व केंद्रीय पंचायत राज "राज्य मंत्री" श्री .कपिल पाटील यांनी सहभाग घेतला होता.


       भाजपच्या या बाईक रॅलीत तरुणांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला होता. भिवंडी लोकसभा मतदार क्षेत्रात भाजप पक्ष भरी घेताना दिसत आहे. या बाईक रॅलीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे व पंचायत राज "राज्यमंत्री" यांनीच फक्त वाहतूक नियमाचे पालन करून हेल्मेट घातले होते, मात्र इतर  बाईक चालकांना हेल्मेट घालण्याचा विसर पडल्याने अनवधानाने त्यांच्या कडून वाहतूक नियमाचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. 

         या रॅलीत कोपर गावचे नवनिर्वाचित थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच श्री.हेमंत घरत, सुजित (तात्या) पाटील हे रॅलीत आघाडीवर दिसत होते. पंचायत राज "राज्य मंत्री" कपिल पाटील यांच्या उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये संघटनेचा पाय मजबूत होत आहे. त्याचे फळ म्हणून तालुक्यात नुकत्याच पार  पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपचाच बोलबाला राहिला असून सर्वात जास्त सरपंच भाजपचेच निवडून आले आहेत.

         मात्र नुकत्याच पार पडलेल्या कोनगाव व कोपर गाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचे दोन गट निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. कोपर गावात भाजप कार्यकर्त्यांनी पार पडलेल्या सरपंच निवडणूकीत शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यामुळे कोपर गाबात भाजपचे दोन गट असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच प्रत्येक गावा गावात भाजप कार्यकर्त्यान मध्ये नाराजी असल्याने दोन गट पडत असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न "

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न " सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त...