Tuesday, 3 January 2023

अंगणवाडी कर्मचारी यांचे मोबाईल वापसी आंदोलन पुन्हा पेटणार...

अंगणवाडी कर्मचारी यांचे मोबाईल वापसी आंदोलन पुन्हा पेटणार...

चोपडा, प्रतिनिधी.. अंगणवाडी कर्मचारी यांना गेल्या५ वर्षी पासून देणेत आलेले मोबाईल कमी जी बी चे व नित्कृष्ट निघाले आहेत आणि या

वारंटी/ गरंटी संपलेल्या मोबाईल परतीचा कार्यक्रम राज्यभर पुन्हा सुरू करण्यात येणार आहे असा  इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक जळगाव जिल्हा शाखेच्या पत्रकात देण्यात आला आहे 

याबाबत आणखी माहिती अशी की,     .अंगणवाडीतील अशा भ्रमणध्वनीवर ईन्ग्रजी अप वरून पोषण ट्रकर न भरणे.एम पी आर  न देणे.. आधार सिडिंग कामांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे मोबाईल वापसी.. आंदोलन पुढील आठवड्यात नियोजन करणेत येत आहे  बाबत प्रशिद्धिस दिलेल्या निवेदनात युनियन चे जिल्हा शाखा अध्यक्ष का अमृतराव महाजन यांनी म्हटले आहे की, गेल्या दि. 31 डिसेंबर 2023 रोजी अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या राज्य कमिटीची झूम मिटींग राज्य कार्याध्यक्ष का दिलीप उटाणे यांचे अध्यक्षतेखाली झाली. 

बैठकीत काॅ. माधुरी क्षीरसागर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनावर निघालेल्या प्रचंड मोर्चात मुख्यमंत्री यांच्याबरोबर शिष्टमंडळाने केलेल्या चर्चेचे रिपोर्टींग केले. मुख्यमंत्री यांनी जानेवारी 23 मध्ये  मागण्यांसंदर्भात बैठक लावण्याचे मान्य केले.आहे तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनवाढीच्या प्रश्नांबाबत व मोबाईल देणेबाबत सरकार सकारात्मक विचार करीत असल्याचे सांगितले आहे.या बैठकीत खालील ठोस निर्णय घेण्यात आले.

१) सर्व जिल्ह्यांतील सेविकांनी त्यांचे मोबाईल दि. 3 जाने ते 20 जानेवारी 2023 या कालावधीत प्रकल्प कार्यालयात परत करावेत.
२) पोषण ट्रॅकर अॅप, आधार सिडिंग तसेच एम पी आर यावर बहिष्कार कायम ठेवावा एक डिसेंबर २०२२ पासुन सदर बहिष्कार सुरू आहे जळगाव जिल्हा कमेटीने त्याची नोटीस जळगाव जिल्हा परिषद चे जिल्हा कार्यपालन अधिकारी यांना २२/१२/२२ला दिली आहे.
३) जानेवारीच्या अखेरीपर्यंत शासनाने मानधनवाढ, नवीन मोबाईल व इतर महत्त्वाच्या प्रश्नांबाबत  युनियनच्या नेत्यांशी चर्चा न केल्यास युनियनच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा राज्य व्यापी संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे येईल.

या निर्णयांची अंमलबजावणी जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे सभासद संघटना करिता आहेत. त्यानूसार या आधी एम पी आर देणे चे काम जिल्ह्यात धरणगाव जामनेर प्रकल्प.. शहापूर सैक्ठर तहकूब केले आहेत यापूढे संघटनेच्या आदेश येईपर्यंत एम पी आर देणे तहकूब करण्यात आले आहे

तसेच ३ जाने २०२३ .. मोबाईल वर काम बंद... पोषण ट्रॅकर चे काम बंद.. आधार सिडींग काम बंद करीत आहोत .
वारंटी/ गरंटी संपलेल्या भ्रमणध्वनी बोंबले (मोबाईल) परतीचा कार्यक्रम करण्यात येणार आहे असे जळगाव जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी यूनियन चे अध्यक्ष का अमृतराव महाजन वत्सलाबाई पाटील व प्रेमलता पाटील  यांनी जाहिर केलेल्या पत्रकात नमूद केले आहे

No comments:

Post a Comment

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न "

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न " सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त...