कोरोनाच्या लाटेतुन वाचले, आता चांगले कामे करण्याचा सल्ला
औरंगाबाद/बजाजनगर, अखलाख देशमुख, दि. २ : गेल्या पाच वर्षात कोरोनाच्या महामारीने संपूर्ण विश्व हादरून गेले. या संकटात अनेक अनेकांचे आई वडिल, भाऊ बहीण, नातेवाईक हिरावून घेतले. त्यामुळे कोरोनाच्या लाटेतुन वाचले, आता चांगले कामे करण्याचा सल्ला निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी दिला. तसेच दान धर्म करा, मदत करा. साप्ताहात केलेलं अन्नदान वाया जात नाही, असे त्यांनी सांगितले.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचा कीर्तन सोहळा औरंगाबाद पश्चिम मतदार संघात बजाजनगर येथे पार पडला.
यावेळी लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.
याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, ऍड. आशुतोष डंख, नगरसेवक सचिन खैरे, उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, उपतालुकाप्रमुख विष्णू जाधव, गणेश पाटील, सागर शिंदे, बबन दिंडोरे, गायके महाराज, कैलास भोकरे, दत्तात्रय वरपे, विजय सरकते, मनोज गायके, विकी गिरे, अमोल पोटे, प्रतीक बाफना, मीरा पाटील, छाया जाधव, विशाल खंडागळे आदींसह मोठया संख्येने भाविकांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment