Monday, 2 January 2023

उज्जैन येथे बाळासाहेब तोरस्कर यांचा अटल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान !

उज्जैन येथे बाळासाहेब तोरस्कर यांचा अटल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान !

ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : येथील जेष्ठ कवी, लेखक व समाजसेवक अॅड. बाळासाहेब तोरस्कर यांना ३० व्या राष्ट्रीय संचेतना महोत्सव व अटल बिहारी वाजपेयी जयंती निमित्त राष्ट्रीय शिक्षक संचेतना उज्जैनच्या वतीने "दैवतुल्य मानव" या पुस्तकातील त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रपर लेखाबद्दल राष्ट्रीय लेखक म्हणून अभिनंदनीय सन्मान तसेच अटल जयंती स्मृती राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

फ्यूचर व्हिजन महाविद्यालय, डॉ.मुंगी चौक, देवास रोड, उज्जैन (मध्य प्रदेश) येथे संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. के. शर्मा यांच्या हस्ते त्यांना स्मृतीचिन्ह, अभिनंदनपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी संस्थेचे महासचिव डॉ. प्रभु चौधरी, विक्रम विश्वविद्यालयाचे प्रशासक डॉ. शैलेद्रकुमार शर्मा, सुप्रसिद्ध हिंदी कवी महेश सनाढ्य, माजी विभागीय आयुक्त डॉ. मोहन गुप्त, आयएएस डॉ. अशोककुमार भार्गव, राजेश जैन, हिंदी कवी यशवंत भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
                   
तोरस्कर यांना हा पुरस्कार त्यांच्या साहित्यिक, शैक्षणिक तसेच कवितेच्या माध्यमातून राष्ट्र आणि समाजाला नवी दिशा देण्याच्या योगदानाबद्दल देण्यात आला.‌ ते काव्य कला प्रतिष्ठान ठाणेचे संस्थापक कार्यवाह व काव्यगंध मुंबईचे संस्थापक कार्याध्यक्ष या नात्याने त्यांनी या संस्थांच्या माध्यमातून अनेक नवोदित कवी कवयित्रींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. तसेच ते साहित्य संपदा दिवाळी अंकाचे निवासी संपादक, कृषिराज दिवाळी अंकाचे उपसंपादक, माझे व्यासपीठ व महान मराठा दिवाळी अंकांचे माजी सहसंपादक आहेत. दैनिक व साप्ताहिक सुफ्फा अकोला हिंदीचे ते स्तंभलेखक आहेत. ते अनेक सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक संस्थांचे संस्थापक व पदाधिकारी आहेत. अ.भा.मराठी साहित्य परिषदेचे ठाणे विभागीय अध्यक्ष, शिक्षक संचेतनाचे राष्ट्रीय प्रवक्ता, काव्यप्रेमी शिक्षक मंच महाराष्ट्राचे सल्लागार समिती सदस्य, कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी आहेत.
                     
तोरस्कर यांना यापूर्वी अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय सामाजिक व साहित्यिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तोरस्कर यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले असून त्यांंना अनेक नामांकित राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. समाजातील विविध थरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांवरील अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटकाचा बुधवार १२ रोजी शुभारंभ !

छत्रपती संभाजी महाराजांवरील अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटकाचा बुधवार १२ रोजी शुभारंभ ! मुंबई, प्रतिनिधी‌ : आत्ताच्या सोशल मिडिय...