प्रत्येक भारतीय मतदारासाठी अतिशय महत्त्वाचा हा दिवस. या दिवशी प्रत्येक भारतीय मतदाराने देशातील सर्वच निवडणुकांत सहभागी होऊन आपली मतदानाची जबाबदारी पार पाडण्याची शपथ घ्यावी. कारण प्रत्येक भारतीय मतदाराचे मत देशाच्या भविष्याचा पाया घालते. म्हणून प्रत्येक व्यक्तीचे मत राष्ट्रनिर्मितीत अमूल्य आहे. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली. लोकांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने 2011 पासून भारत सरकारने निवडणूक आयोगाची स्थापना या दिवशी केली. म्हणून प्रत्येक मतदाराने आपली सांविधानिक जबाबदारी पार पाडून लोकशाही मजबूत करण्याचा संकल्प करायलाच हवा. आज राष्ट्रीय मतदार दिन. यानिमित्ताने चला, लोकशाहीच्या या उत्सवात सक्रियतेने सहभागी होऊन मतदानाचा पवित्र अधिकार जागवूया !
अखलाख देशमुख, औरंगाबाद
No comments:
Post a Comment