औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १९ : सिल्लोड शहरातील कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष तथा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम , छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी जि.प. उपाध्यक्ष केशवराव पा. तायडे , जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, न.प. गटनेता तथा उत्सव समितीचे सचिव नंदकिशोर सहारे, महासचिव राजेंद्र ठोंबरे, डॉ. मच्छिन्द्र पाखरे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग दुधे, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, तालुकाप्रमुख दीपाली भवर, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, रउफ बागवान, सुधाकर पाटील, आसिफ बागवान, प्रशांत क्षीरसागर, सत्तार हुसेन, मनोज झंवर, जितू आरके, राजू गौर, बबलू पठाण, राजेंद्र बन्सोड, विशाल जाधव, मारुती वराडे, संजय आरके, संजय मुरकुटे, सचिन पाखरे, डॉ. नाना भवर, कुणाल सहारे, फहिम पठाण, संतोष धाडगे, जगन्नाथ कुदळ, संदीप पाटील, राजेश्वर आरके आदी पदाधिकारी - कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment