Tuesday, 7 February 2023

त्यागमूर्ती माता रमाईची जयंती शहापूर तालुक्यातील शेरे गावात उत्साहात साजरी !

त्यागमूर्ती माता रमाईची जयंती शहापूर तालुक्यातील शेरे गावात उत्साहात साजरी !

कल्याण, (संजय कांबळे) : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा ९ कोटीची माता त्यागमूर्ती रमाबाई भिमराव आंबेडकर यांची जयंती शहापूर तालुक्यातील शेरे गावात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

शहापूर तालुक्यातील शेरेगावातील किशोर मंगल पंडित व त्यांच्या पत्नी सौ माधुरी किशोर पंडित यांच्या घरी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांची आज ७ फेब्रुवारी १८९८ रोजी कोकणातील दापोली जवळील वनदगाव येथे जन्म झाला, अत्यंत गरीबी असलेल्या रमाईचा  विवाह एप्रिल १९०६ मध्ये वयाच्या ९ व्या वर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर झाला, ज्ञानरुपी धगधगत्या सुर्याबरोबर संसार करणे अवघड असतानाही तिने बाबासाहेबांना समर्थपणे साथ दिली, अत्यंत हाल अपेष्टा, कष्ट सहन करून तिने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना बँरिष्टर, होण्यास मदत मोलाचे सहकार्य केले, याशिवाय घटनानिर्मिती मध्ये बाबासाहेबांना शारीरिक व मानसिक साथ दिली, त्यामुळे ती ९ कोटीची माता ठरली, तिला त्यागमूर्ती देखील म्हटले जाते, अशा या मातेची आज जयंती शेरे गावात साजरी झाली.
 
प्रथम भारतीय बौध्द महासभेच्या तृतीय अध्यक्षा अनिता विलास अहिरे यांनी माता रमाईच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली, तर निवृत्त मुख्याध्यापक एस जे कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

केंद्र संचालिका अनिता अहिरे (मुरबाड) यांनी माता रमाईचा जिवनपट उलगडून सांगितला, याप्रसंगी पत्रकार संजय कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, याप्रसंगी सामूहिक त्रिसरन,  पंचशील व परित्रनपाट घेतला.

यावेळी शेरे ग्रामपंचायत सदस्या सविता लक्ष्मण पंडित, भारती पंडित, हर्षला पंडित, निकिता पंडित, बचतगटांच्या माधुरी पंडित, मुक्ताबाई सोष्टे, कामिनी गोरे, (अंबरनाथ), अंगणवाडीच्या वनिता कांबळे, कु नम्रता भोईर (वाशिंद),  (कल्याण) सुनीता कांबळे, संगीता धनगर, रेश्मा धनगर, सुनीता धनगर, कविता दोंदे (पडघा), शाताबाई धनगर, साधना धनगर, विलास अहिरे, नामदेव उबाळे, गोतम उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न "

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न " सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त...