Tuesday, 7 February 2023

मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते श्री मलंग गड येथे सा. सरळ बातमीदार दिनदर्शिका सोहळा - २०२३ संपन्न !

मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते श्री मलंग गड येथे सा. सरळ बातमीदार दिनदर्शिका सोहळा - २०२३ संपन्न !

कल्याण, प्रतिनिधी :
ठाणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कल्याण येथील श्री मलंगगड यात्रेनिमित्ताने श्री मलंगगड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून श्री मच्छिंद्रनाथांचे भक्तीभावाने दर्शन घेऊन मनोभावे पूजन अर्चन केले. 

वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या श्री मलंग उत्सवाला सुरुवात केली. त्यांनी सुरू केलेले उपक्रम, कार्य यापुढेही अविरतपणे सुरू ठेवू असे यावेळी बोलताना स्पष्ट केले. मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच श्री मलंगगडावर येण्याचे भाग्य लाभले असल्याचे याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले. 

या नंतर सा. सरळ बातमीदार, कल्याण यांच्या दिनदर्शिका -२०२३, लोकार्पण सोहळा माघी पौर्णिमेच्या दिवशी वंदनीय बाळासाहेबांचे स्वप्न व विचार पुढे घेऊन चालणारे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना आदर्श मानणारे महाराष्ट्राचे लाडके 'माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब' यांच्या हस्ते श्री मलंग गड येथे संपन्न झाला. 

याप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, आमदार विश्वनाथ भोईर, डॉ.बालाजी किणीकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, प्रवक्ते नरेश म्हस्के, सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, राजेंद्रसिंह वी. भुल्लर (महाराज) शहरप्रमुख उल्हासनगर, कल्याण- उल्हासनगर प्रांत, कल्याण- उल्हासनगर- अंबरनाथ तहसिलदार तसेच मा. नगरसेवक, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच संपादक - सचिन बुटाला, सहसंपादक - नारायण सुरोशी व मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न "

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न " सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त...