Tuesday, 7 February 2023

क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनातून ग्रामविकासाच्या शाश्वत परिवर्तनासाठी कातळवाडीतील तरुणांचा स्तुत्य उपक्रम !

क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनातून ग्रामविकासाच्या शाश्वत परिवर्तनासाठी कातळवाडीतील तरुणांचा स्तुत्य उपक्रम !

मुंबई  -(दीपक कारकर /शांताराम गुडेकर )

              "क्रिकेट" या जगप्रसिद्ध खेळाचे आयोजन करताना संघटन कौशल्य ( टीम वर्क ) आणि नियोजन महत्वूर्ण असते.नुकत्याच चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे ( कातळवाडी ) गावच्या "कातळवाडी ग्रामीण-मुंबई सेवा मंडळ" तर्फे भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मुंबईतील चर्चगेटच्या ओव्हल मैदानात करण्यात आले होते. 

             कातळवाडीतील तरुणांच्या संकल्पनेतील एकसंघ गाव आणि आदर्श गावचा कायाकल्प घडविण्याच्या एकमेव उद्देशाने सारे तरुण एकवटून ही स्पर्धा रविवारी यशस्वीपणे पार पडली. ह्या स्पर्धेत १६ संघानी आपला सहभाग नोंदवला होता. वाडी मर्यादित गट स्वरुपाची ही स्पर्धा होती.

          या नियोजनातून वाडीतील तरुण व ज्येष्ठ सभासदांच्या मनात निर्माण झालेली आंतरिक ऊर्जा प्रत्येकाला स्तब्ध बसू देत नव्हती.काहीतरी वेगळेपण निर्माण करत, गावच्या उन्नतीसाठी चांगल काम करण्याची प्रेरणा या  स्पर्धेच्या आयोजनातून आली.या स्पर्धेत प्रथम क्रमांक ओंकार हेडेश्र्वर ( गुरववाडी ), द्वितीय क्रमांक - यंग स्टार (रामाणे वाडी ), तृतीय क्रमांक - चंडिका क्रिकेट संघ, ( केरे) तर चतुर्थ क्रमांक - झोलाई देवी क्रिकेट संघ ( खेड ) आदी संघ या  स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे ठरले. स्पर्धेतील विजयी संघाना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

             स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्याला
 कातळवाडीतील सर्व ज्येष्ठ -श्रेष्ठ सभासद,तरुणाई व कातळवाडी ग्रामीण- मुंबई सेवा मंडळाची कार्यकारिणी कमिटी मोठ्या संख्येनं उपस्थित होती. वाडीतील तरुण युवकांच्या अथक परिश्रपूर्वक मेहनतीतून पार पाडलेल्या ह्या स्तुत्य उपक्रमाचे वरिष्ठांनी भरभरून कौतुक केले, दिवसभर स्पर्धेच्या आयोजनात जबाबदारीने कर्तव्य बजावणाऱ्या व देणगी स्वरूपात योगदान देणाऱ्या सर्व शिलेदार/हितचिंतक यांचे मंडळातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक कारकर यांनी केले. व मुंबई मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग जोशी /उपाध्यक्ष सखाराम नेवरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.अतिशय दर्जेदार आयोजनात पार पडलेल्या ह्या क्रिकेट स्पर्धेचे अनेकांकडून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न "

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न " सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त...