निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर संपूर्ण महाराष्ट्रासह कल्याण येथे शिवसैनिकांचा जल्लोष !
आत्तापर्यंत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसेचे राज ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार, आमदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाकडे धनुष्यबाण गेल्यानंतर मुंबई, पुणे, ठाण्यात आणि ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शिंदे समर्थकांनी निवडणूक आयोगाच्या निकालानंतर रस्त्यावरुन उतरून एकच जल्लोष केला. आजचा दिवस हा शिदें गटासाठी आनंदाचा ठरला आहे.
अनेक ठिकाणी पेढे वाटत तर ढोल-ताश्यांसहित वाजंत्रीसोबत शिंदे गटानं जल्लोष स्वागत केले आहे.
सायंकाळी शिंदे गटाकडून कल्याण पश्चिम येथे छत्रपती शिवाजी चाैकात कार्यकर्त्यांनी जल्लाेष साजरा केला. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भाेईर आणि शहर प्रमुख रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी फटाके फाेडून व पेढे वाटून जल्लाेष साजरा केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळेस विश्वनाथ भोईर यांनी संजय राऊत व ठाकरे गटावर टीका केली. तसेच आज सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी माजी नगरसेवक जयवंत भाेईर, प्रभूनाथ भाेईर, छाया वाघमारे, माेहन उगले आदी मान्यवर उपस्थित हाेते.
No comments:
Post a Comment