औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी वेडसर युवकास केले नातेवाईक कडे सुपूर्द !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १८ : एक वेडसर युवक वय 35 वर्ष रा. जकमाथा ता. गंगापूर जिल्हा औरगाबाद
हा मागील काहीं दिवसापासून डोक्यावर परिणाम होऊन वेडसर झालेला आहे
17 फेब्रुवारी 23 ला जाकमाथा येथून 9:00 वाजेच्यां दरम्यान सकाळी घरातुन घरी कुणीही नसताना पळाला होता
गंगापूर सिद्धनाथ वाडगाव मार्गे लासूर स्टेशन ला पोहचला
रेल्वे पटरी वर रात्रीच्या 23: 00 वाजे च्या सुमारास पायी इकडे तिकडे पळत सुटला हा प्रकार रात्र पाळी च्या रेल्वे गेट नंबर 34 ला कार्यरत कर्मचारी दिलीप काशिदे याने त्यास हटकले तर तो अजून इकडे तिकडे पळत सुटला नेमकी या वेळी मुंबई आदिलाबाद 11401 नंदीग्राम एक्सप्रेस ही लासूर हून औरंगाबाद कडे निघाली.
तर सिकंदराबाद मुंबई देवगिरी एक्स्प्रेस 17058 ही 20 मिनीटात पोटुळ रेल्वे स्टेशन ला नंदीग्राम एक्स्प्रेस सोबत क्रॉसिंग होऊन येणार असून रेल्वे कर्मचारी दिलीप यांनी वेडसर युवकास पकडुन हि माहिती रेल्वे स्टेशन मास्तर राजेश गुप्ता यांना दिली.
राजेश गुप्ता यानी ही माहिती तात्काळ रेल्वे सेना अध्यक्ष सोमाणी संतोषकुमार व रात्रपाळीस असलेले PSI युसूफ शेख शिल्लेगावं पोलीस ठाणे यांना देण्यात आली.
PSI युसुफ शेख यांनी तातडीने रेल्वे गेट क्रमांक 34 ला पोलीस कर्मचारी चालक अक्षय साळुंके सह पोहचले
रेल्वे सेना अध्यक्ष सोमाणी व शिल्लेगाव पोलीस ठाणे PSI युसुफ शेख यांनी तो कोणकोणत्या ठिकाणी थांबला ते शोधुन त्यांच्या जवळील एक पिशवी मार्केट कमिटी जवळ मिळुन आली ती तपासली असता त्यात त्याचे व मुलगी व इतर नातेवाईक चे आधार कार्ड व इतर कागपत्रे मिळुन आली.
त्यावरुन साकेगाव ( मनुर) ता वैजापूर येथील गंडे या मित्रास रेल्वे सेना अध्यक्ष सोमाणी यांनी फोन करून नातेवाईक विषयी माहिती विचारली असता त्यांनी घरी जावून निरोप देत फोन वर बोलणे करून दिले.
यावरून वडील गावणाथ चुलत भाऊ गणेश म्हस्के, याचे मित्र इत्यादी लासूर स्टेशन येथे पोहचले.
रात्री 3:00 वा या युवकाला नातेवाईकाला सुपूर्द केले
वडील व भाऊ यास शोधत होते तो मिळुन आल्याने मी पोलीसात देवाला पाहिलं असे म्हणत आभार व्यक्त केले व वेडसर शाम या मुलाला घट मिठ्ठी देत गाडीत बसून घरी गावाकडे निघून गेले.
No comments:
Post a Comment