आई माऊली प्रतिष्ठान आयोजित आई माऊली चषक अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन !
मुंबई, (केतन भोज/शांताराम गुडेकर) :
शैक्षणिक, सामजिक,सांस्कृतिक आणि क्रिडा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या विक्रोळी पश्चिम येथील आई माऊली प्रतिष्ठान तर्फे आई माऊली चषक अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवार दि.५ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज मैदान, पार्कसाईट विक्रोळी( पश्चिम) मुंबई -४०० ०७९ या ठिकाणी करण्यात आले आहे. सामने सकाळी ठिक १०.०० वाजता सुरू करण्यात येणार असून,यावेळी प्रवेश फी १,५०० रुपये इतकी असून प्रथम विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक रुपये १२,०००/- व द्वितीय विजेत्या संघाला रुपये ८,०००/- जाहीर करण्यात आले आहे.तरी इच्छुक सर्व संघांनी सहभाग नोंदवून सहकार्य करावे असे आवाहन आई माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक- तुषार निर्मळ, सचिन सावंत (अध्यक्ष), अनुदिप गोसावी (खजिनदार), निशांत पांगे (कार्याध्यक्ष), गिरीश नार्वेकर (सचिव), अंकेश अलगुडे (उपसचिव), अक्षय जवीर (उपखजिनदार) यांच्या वतीने करण्यात आले आहे. तरी अधिक माहितीसाठी अक्षय जावीर- ९०८२०१२९८५, अमर अपराध- ९७६९७६४८३३ यांच्याशी संपर्क करावा.
No comments:
Post a Comment