Thursday, 2 February 2023

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्यावतीने नासासाठी निवड झालेल्या आर्यन संजय गुरव या विद्यार्थ्यांचा केला सन्मान !

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्यावतीने  नासासाठी निवड झालेल्या आर्यन संजय गुरव या विद्यार्थ्यांचा केला सन्मान !

कोकण (शांताराम गुडेकर /दीपक मांडवकर) :
                 जिल्हा परिषद रत्नागिरी, जाणू विज्ञान, अनुभव विज्ञान, अंतर्गत नासा व इस्रो संस्थांना भेट स्पर्धा परीक्षेत तालुका लांजा मधून जि.प.पू. प्राथमिक शाळा वनगुळे नं- १ मधील विद्यार्थी कुमार -आर्यन संजय गुरव याची इस्रो भेट दौऱ्यासाठी जिल्हास्तरावर निवड झाल्यामुळे त्याला (गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या) वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच त्याला मार्गदर्शक करणाऱ्या शाळेतील सर्व शिक्षक वृंदांचे व विद्यार्थ्याचे तसेच विद्यार्थ्याच्या पालकाचे अभिनंदन करण्यात आले. 


या प्रसंगी गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष/संस्थापक तसेच कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा लांजाचे सह -सचिव व उच्च न्यायालय मुंबई येथे कार्यरत असणारे समाजसेवक सन्मा. श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे, संस्थेचे उपाध्यक्ष व माजी सभापती पंचायत समिती लांजा श्री.सुभाष  रामाणे, सचिव-श्री अमोल मेस्त्री, सदस्य व गवाणे गावचे पोलीस पाटील श्री.रवींद्र कोटकर, सदस्य श्री.महादेव पाटील, तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे ग्रामपंचायत सदस्य श्री.अशोक गुरव, व्यवस्थापन अध्यक्ष श्री.गणपत गुरव व्यवस्थापक समिती उपाध्यक्ष-सौ. मानसी आग्रे, समाजसेवक -शांताराम पळसमकर, वनगुळे शाळा नंबर -१चे मुख्याध्यापक- श्री. दयानंद लाखन, वनगुळे शाळा नं -२ च्या मुख्याध्यापिका- सौ.अनघा हर्डीकर मॅडम, पदवीधर शिक्षक -श्री. विलास गोरे,  उपशिक्षक- श्री.रवींद्र निवळे सर , श्री. बाळू नागरगोजे सर,व्यवस्थापन समितीचे सदस्य- सौ. मनीषा गुरव, सौ. शिंदे मॅडम, पालक श्री. संजय गुरव, सौ. संजना संजय गुरव, कुमार. आर्यन गुरव आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय ग्रामस्थ मंडळी व विद्यार्थी -विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने उपस्थित होते. यनिमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर आणि ग्रामस्थ, विद्यार्थी वर्ग यांनी  कुमार आर्यन संजय गुरव याला अभिनंदन सह शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...