समाजसेविका पुजा सुमित पंडित यांना सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्कार जाहीर !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २ : समाजसेविका पुजा सुमित पंडित यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ते करीत असलेल्या रजंल्या गांजल्याची सेवा खरंच समाजापुढे वाखाडण्याजोगी आहे, रस्तावर फिरणाऱ्या मनोरुग्णाची दाढीकरुन देऊन, केस कापून स्वच्छ अंघोळ घालुन त्यांना मनोविकृती रुग्णालयात दाखल करतात, गरजू रुग्णांना अर्धा रात्री मेडिकल साहित्य, भोजन, रक्त, पुरविण्यात ही जोडी देवदुतासारखी मदतीला धावून जाते, बेवारसांचे अत्यंविधी सुध्दा हे दांपत्य माणुसकी समुहाच्या माध्यमातून करतात, पुजा सध्या माणुसकी वृध्दाश्रम चालवतात त्यांचे औरंगाबाद येथे माणुसकी वृध्द सेवालय देखील वृध्दाच्या सेवेसाठी मदतकार्य करते, व शासकीय रुग्णालयात रात्री येणाऱ्या गरजू रुग्णांना दररोज भोजनव्यवस्था पुजा ह्याच करतात. त्यामुळेच त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत, सन्मानित करण्यात येणार आहे, सर्व माननिय सत्कार मुर्तीनां कळवण्यात आनंद होत आहे.
संत तुकाराम महाराज युवा फांऊडेशन यांच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे,ह्या कार्यक्रमाला संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प.अशोक महाराज मोरे व उद्योजक श्रीराम पाटील व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा सोहळा पंचायत समिती सभागृह भुसावळ येथे दिनांक.०३-०२-२०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजक संस्थापक अध्यक्ष छबिलदास पाटील, यांनी पुरस्कार जाहीर झाल्याचे संत तुकाराम महाराज फाँऊडेशन निवड समितीतर्फे पत्राद्वारे कळविले आहे.या आधी पुजा यांना विविध २५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ह्या पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजात पुजा पंडित यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment