विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंच्या हस्ते शिवज्योत प्रज्वलित !
*औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १९ :* गेल्या ३४ वर्षांपासून भारतीय कामगार सेनेच्या वतीने औरंगाबाद येथे शिवजयंती निमित्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने "शिवज्योती रॅलीचे" आयोजन करण्यात येते. ही परंपरा कायम राखत यंदा देखील या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करून शीवज्योत प्रज्वलित करण्यात आली.
सकाळी ठीक ८:०० वाजता धावती मशाल घेऊन देवगिरी किल्ला येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. दौलताबाद देवगिरी किल्ला ते क्रांतीचौक मार्गात रॅलीचे आयोजन करण्यात आले. क्रांतीचौक येथील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ रॅली ची सांगता झाली.
यावेळी अभय पत्की साहेब, वालतुरे सर, भारतीय कामगार सेनेचे प्रभाकर मते, सचिन ढाले, सोपान बांगर यांच्यासह सर्व भारतीय कामगार सनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment