मी म्हारळकर संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी, देखावा बनला आकर्षण !
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या म्हारळगावातील 'मी म्हारळकर, या सामाजिक संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कल्याण मुरबाड महामार्गावर आणि म्हारळगावाच्या प्रवेशद्वारासमोर साकारण्यात आलेला शिवराज्याभिषेक सोहळा हा चलचित्र देखावा खास आकर्षण बनला होता.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते व म्हारळ ग्रामपंचायतीचे माझी उपसरपंच निलेश देशमुख, आणि त्यांच्या सहकारी मित्रांच्या संकल्पनेतून मी म्हारळकर, या सामाजिक, लोकोपयोगी संस्थेची निर्मिती झाली आहे. यांच्या माध्यमातून गावात व परिसरात विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम व मदतीचा हात पुढे केला जातो.
आज अंखड हिंदूस्थानचे आराध्य दैवत, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त या संस्थेच्या वतीने कल्याण मुरबाड मार्गावरील म्हारळ प्रवशेव्दारासमोर उभारण्यात आलेल्या भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन म्हारळ पोलीस चौकीचे इन्स्पेक्टर रोहित खोत, सुपेकर, ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण चे जिल्हा अध्यक्ष भरत गोंधळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मी म्हारळकर संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या संस्थेचे निलेश देशमुख, व त्यांचे सहकारी यांनी हा सन्मान सोहळा पार पाडला.
यावेळी म्हारळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अश्विनी देशमुख, वेदिक गंभीरराव, राजू चव्हाण,किशोर वाडेकर, प्रकाश कोंगीरे, यासह मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होते.
यानंतर दुपारी गावदेवी मंदिर म्हारळ ते शिवनेरी अश्या शिवज्योत प्रस्तान सोहळा संपन्न झाला आणि सायंकाळी छत्रपतींच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढली. यावेळी विविध साहसी खेळाचे प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितीतांची मने जिंकली.तसेच मी म्हारळकर यांनी सादर केलेला शिवराज्याभिषेक देखावा येणाऱ्या जाणा-या लोकांचे लक्ष वेधून घेत होता, अनेक स्त्री पुरुष, लहान मुले मुली येथे सेल्फी काढत होते. प्रत्येक प्रवासी महारांजांचे दर्शन घेऊन त्यांना मुजरा करत होते. दरम्यान महिला अस्सल न ऊवारी साडीमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीत भर घालत होत्या. छत्रपती शिवाजी महाराज, जय शिवाजी जयभवानी अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. याशिवाय वरप, येथे जनाधार निर्भीड पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय कांबळे, कांबा, रायते, गोवेली, टिटवाळा, अश्या संपूर्ण कल्याण तालुक्यात शिवजयंती घराघरात व मनामनात विविध उपक्रम राबवून साजरी झाली.
No comments:
Post a Comment